Four teams will qualify for the T20 World Cup | टी२० विश्वचषक स्पर्धेत चार संघ पात्रता फेरीतून

टी२० विश्वचषक स्पर्धेत चार संघ पात्रता फेरीतून

दुबई : भारतात २०२१ मध्ये होणाऱ्या आयसीस टी२० विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ पात्रता फेरीतून येतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली.
ही स्पर्धा आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जागी खेळविण्यात येणार आहे. आयसीसीच्या प्रसिद्धीविभागाने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीच्या पाच विभागातून ११ पात्रता फेरी खेळवल्या जातील. यातील आठ संघ दोन पैकी एका जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
याशिवाय २०२० मध्ये होणाºया टी२० विश्वचषक स्पर्धेतील तळाच्या चार संघांना विभागीय पात्रता फेरीत खेळावे लागेल. त्याचबरोबर जानेवारी २०२० पर्यंत ज्या संघांचे रॅँकींग १३ ते १६ दरम्यान आहेत या हे संघही जागतिक पात्रता फेरीत खेळू शकतील. यात झिम्बाब्वे, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात व हॉँगकॉँग यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Four teams will qualify for the T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.