भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचे निधन 

न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशननंही ब्रुस यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 03:01 PM2021-02-06T15:01:24+5:302021-02-06T15:01:41+5:30

whatsapp join usJoin us
Former New Zealand all-rounder Bruce Taylor, who got a ton & 5 wickets on debut vs India, no more | भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचे निधन 

भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचे निधन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक अन् पाच विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम नोंदवणारे  न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू ब्रुस टेलर ( Bruce Taylor) यांचे ७७व्या वर्षी निधन झालं. १९६५साली भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाच्या दुसऱ्या कसोटीत ब्रुस यांना पदार्पणाची संधी मिळाली. मध्यमगती गोलंदाज असलेल्या ब्रुस यांनी कोलकाता कसोटीत बॅरी सिंक्लेअर हे आजारी पडल्यामुळे अंतिम ११मध्ये स्थान पटकावले होते. १००व्या कसोटीत जो रूटचा World Record!; सुनील गावस्कर यांचाही मोडला विक्रम

न्यूझीलंडचे सहा फलंदाज २३३ धावांवर माघारी परतले असताना ब्रुस यांनी बेर्ट सुटलीफ यांच्यासोबत सातव्या विकेटसाठी १६३ धावा जोडल्या. यात ब्रुस यांनी १५८ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकार खेचून १०५ धावा केल्या. त्यानंतर ब्रुस यांनी गोलंदाजतही कमाल दाखवताना फारुख इंजिनियर, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, मन्सुर अली खान पतौडी व वेंकटराघवन यांची विकेट घेत भारताचा डाव ३८० धावांवर गुंडाळवा व न्यूझीलंडला ८२ धावांची आघाडी मिळवून दिली. कर्णधार पतौडी यांनी १५३ धावा केल्या.  हा सामना अनिर्णीत राहिला.  टीम इंडियाचं काही खरं नाही!; १६ वर्षांनंतर इंग्लंडनं करून दाखवला 'हा' भारी पराक्रम!

ब्रुस यांनी ३० कसोटींमध्ये १११ विकेट्स घेतल्या व ८९८ धावा केल्या. १९७३मध्ये त्यांनी इंग्लंडचा अखेरचा दौरा केला.  

 

Web Title: Former New Zealand all-rounder Bruce Taylor, who got a ton & 5 wickets on debut vs India, no more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.