आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? शकिबचं भारतीय कनेक्शन आलं समोर

आयपीएल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:34 AM2019-10-30T10:34:41+5:302019-10-30T10:39:24+5:30

whatsapp join usJoin us
fixing in the IPL? Shakib al hasan's Indian connection has come to the fore with bookies | आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? शकिबचं भारतीय कनेक्शन आलं समोर

आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? शकिबचं भारतीय कनेक्शन आलं समोर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आयपीएलवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे काळे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. कारण बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनवर फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. पण ही फिक्सिंगची गोष्ट आयपीएल सुरु असताना झाल्याचे आता सर्वांसमोर आले आहे. कारण शकिब जेव्हा फिक्सिंग करत होता तेव्हा आयपीएल सुरु होते. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे.

Image result for shakib al hasan in ipl fixing

शकिब हा 2017 आणि 2018 या कालावधीमध्ये एका सट्टेबाजाच्या संपर्कात होता. त्यावेळी शकिब आयपीएल खेळत होता आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होता. शकिबकडून सट्टेबाजाने संघातील बैठकीमध्ये नेमके काय घडते, याबाबतची माहिती मागवण्याचे समोर आले आहे.

शकिब हा भारताच्या दीपक अगरवाल नावाच्या सट्टेबाताच्या संपर्कात होता. या दोघांमध्ये अनेकदा संभाषण आणि चॅटींग झाल्याचे पुरावे आहेत. शकिबनेही ही गोष्ट मान्य केली असल्यामुळे क्रिकेट जगताबरोबर आयपीएलसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलला बट्टा लागल्याचे चाहते म्हणत आहेत.

बांगलादेशचा कर्णधार आणि आयसीसीच्या जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई आयसीसीने केली आहे. त्यामुळे आता भारताच्या दौऱ्याला शकिबला भारताच्या दौऱ्यावर येता येणार नाही. त्यामुळे बांगलादेशच्या निवड समितीने आता नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूंनी बंड केले होते. त्यावेळीच हा दौरा हाणार की नाही. याबाबत साशंकता होती. त्यानंतर आता शकिबवर बंदी घातल्यावर बांगलादेशचा कर्णधार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न होता. या दौऱ्यातून बांगलादेशचा अनुभवी खेळाडू तमीम इक्बालनेही माघार घेतली होती. पण हा प्रश्न आता बांगलादेशच्या निवड समितीने सोडवला आहे. आता बांगलादेशचे नेतृत्व महमुदुल्लाहकडे सोपवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी कठोर निर्णय देताना बांगलादेशचा कर्णधार आणि आयसीसीच्या जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आह. त्यानं तीन आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. त्यानंतर आयसीसीनं हा निर्णय घेतला.  त्यामुळे त्याला पुढील मोसमात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे.

किब म्हणाला,''ज्या खेळावर मी मनापासून प्रेम केलं, त्यापासून दोन वर्ष दूर रहावे लागणार असल्यानं खुप निराश आहे, परंतु मी माझी चूक मान्य करतो.''  शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर ही बंदीची कारवाई झाली.
कलम 2.4.4 - फिक्सिंगची ऑफर असल्याची माहिती शकिबनं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही. जानेवारी 2018मध्ये तिरंगी मालिके दरम्यान हा प्रकार घडला होता. शिवाय यापूर्वी एप्रिल 2018मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही त्याला फिक्सिंगची ऑफर होती. तिही त्यानं आयसीसीला दिली नाही. 

शकिबनं हे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा काळ 2018 पासून सुरू होणार असल्यानं तो 29 ऑक्टोबर 2020मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो.  आयसीसीचे महाव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की,''शकिबकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. त्यानं आयसीसीच्या अनेक शिबिरांना हजेरी लावली आहे. तरीही त्यानं नियमांचे उल्लंघन केले. त्यानं चूक मान्य केली आहे आणि तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.''

Web Title: fixing in the IPL? Shakib al hasan's Indian connection has come to the fore with bookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPLआयपीएल