बाप रे बाप; हार्दिक पंड्याच्या घडाळ्याची किंमत ऐकाल तर चक्कर येऊन पडाल...

हे घड्याळ 18 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:26 PM2019-10-12T12:26:57+5:302019-10-12T12:28:06+5:30

whatsapp join usJoin us
Father Ray Father; If you hear the price of a Hardik Panda watch, you will be shocked ... | बाप रे बाप; हार्दिक पंड्याच्या घडाळ्याची किंमत ऐकाल तर चक्कर येऊन पडाल...

बाप रे बाप; हार्दिक पंड्याच्या घडाळ्याची किंमत ऐकाल तर चक्कर येऊन पडाल...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असेल. या आपल्या आवडीसाठी कितीही पैसे मोजायला काही व्यक्ती तयारही असतात, अशीच एक व्यक्ती म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. कारण फक्त घडाळ्यासाठी पंड्याने भरपूर मोठी रक्कम खर्च केल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिक सध्याच्या घडीला लंडनमध्ये असून तो आपल्या दुखापतीवर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती. या सर्जरीनंतर हार्दिकला भेटण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी गेल्या होत्या.

सर्जरीनंतर जो हार्दिकचा फोटो शेअर झाला त्यामध्ये एक घड्याळ चमकताना दिसत आहे. हे घड्याळ Patek Philippe या कंपनीचे आहे. या घडाळ्याचे नाव रोज गोल्ड नॉटिलस, असे आहे. हे घड्याळ 18 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आले आहे. या घडाळ्याची किंमत 1 कोटी 38 लाख एवढी आहे.

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; बराच काळ राहणार क्रिकेटपासून दूर
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. भारतीय क्रिकेटपटूंनी हार्दिकला लवकर बरा हो, असे मॅसेज पाठवले आहेत.

हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या विश्वचषकातही हार्दिक खेळला होता. पण सधाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिकने माघार घेतली होती. पण आता त्याच्या दुखापतींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हार्दिकला आता शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
आशिया चषकात  पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

Web Title: Father Ray Father; If you hear the price of a Hardik Panda watch, you will be shocked ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.