डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे चाहत्यांना परत करणार

भारताचा पहिली दिवस-रात्र कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) चौथ्या व पाचव्या दिवसांचे तिकीट विकत घेणाऱ्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:05 AM2019-11-26T05:05:13+5:302019-11-26T05:07:39+5:30

whatsapp join usJoin us
The fans will get return the money of the fourth and fifth day's ticket of the Day-Night Test | डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे चाहत्यांना परत करणार

डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे चाहत्यांना परत करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : भारताचा पहिली दिवस-रात्र कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) चौथ्या व पाचव्या दिवसांचे तिकीट विकत घेणाऱ्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना तिसºया दिवसाच्या पहिल्याच सत्रात संपला. भारताने रविवारी या लढतीत एक डाव व ४६ धावांनी विजय मिळवला.

कॅबने स्पष्ट केले की,‘चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आॅनलाईन तिकीट विकत घेताना अखेरच्या दोन दिवसांचे तिकीट विकत घेणा-या सर्वांना मॅसेज पाठविण्यात येणार आहे.’ भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व बळी घेतले. त्यामुळे भारताने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना जिंकत बांगलादेशला मालिकेत २-० ने क्लीनस्विप दिला.

कॅबचे सचिव अविषेक दालमिया म्हणाले, ‘कॅबने नेहमीच क्रिकेट चाहत्यांची साथ दिली आहे. त्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यात कुठला अपवाद नाही. अखेरच्या दोन दिवसांच्या तिकिटांचे पैस परत करणे आमची नैतिक जबाबदारी आहे. कारण त्या दिवशी कुठला खेळ झालेला नाही.’ या सामन्यासाठी दैनंदिन तिकीट दर ५०, १०० व १५० रुपये होता.
‘कॅब’ने प्रेक्षकांचे आभार मानताना म्हटले की, ‘प्रत्येक दिवशी स्टेडियममध्ये गर्दी केल्यामुळे आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. तिसºया दिवशी फार खेळ होणार नाही, याची लोकांना कल्पना होती, तरी स्टेडियममध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. लोकांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेणारे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे आम्ही आभारी आहोत.’ (वृत्तसंस्था)

Web Title: The fans will get return the money of the fourth and fifth day's ticket of the Day-Night Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.