Exclusive : ना सचिन ना शास्त्री; आपल्या आयुष्यातील खरा सुपरहिरो सांगतोय विराट कोहली

वडिलांच्या निधनानंतरही कोहली सामना खेळायला गेला होता. याबाबत कोहली म्हणाला की...

By प्रसाद लाड | Published: October 26, 2019 04:23 PM2019-10-26T16:23:23+5:302019-10-26T16:27:55+5:30

whatsapp join usJoin us
Exclusive: Neither Sachin Tendulkar nor Ravi Shastri; Virat Kohli is telling the true superhero of his life | Exclusive : ना सचिन ना शास्त्री; आपल्या आयुष्यातील खरा सुपरहिरो सांगतोय विराट कोहली

Exclusive : ना सचिन ना शास्त्री; आपल्या आयुष्यातील खरा सुपरहिरो सांगतोय विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोला डोळ्यापुढे ठेवून आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करत असतो. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यातही एक सुपरहिरो आहे. पण हा सुपरहिरो त्याचा आदर्श क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नाही किंवा सध्या त्याचे ज्यांच्याबरोबर सुत जुळले आहे ते संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही नाहीत. मग कोहलीच्या आयुष्यातील खरा सुपरहिरो आहे तरी कोण...

विराट नेहमीह म्हणत आला आहे की, मी सचिनला पाहून क्रिकेट खेळायला लागलो. सचिन माझ्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळेच कोहलीने एकदा शतक झळकावल्यावर मैदानातूनच कोहली सचिनच्या पाया पडला होता. कोहलीसाठी सचिन आदर्शवत असला तरी तो त्याचा सुपरहिरो नक्कीच नाही.

कोहली आणि शास्त्री यांचीच भारतीय संघात चलती आहे. या दोघांची विचारधारा सारखीच असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे कोहली आणि शास्त्री यांचे चांगलेच जमते. या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला बऱ्याचदा आलेला आहे. शास्त्री हे आपल्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड असल्याचेही कोहलीने म्हटले आहे. पण शास्त्रीदेखील कोहलीचे सुपरहिरो नाहीत.

आपल्या आयुष्यातील सुपरहिरोबद्दल कोहली म्हणाला की, " माझ्या आयुष्यातील सुपरहिरो माझे बाबा आहेत. कारण त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. त्यांनी माझ्यासाठी जे निर्णय घेतले त्यांचा नक्कीच मला आता फायदा होतो आहे. मी भारतासाठी खेळावे हे त्यांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे."

Image result for virat kohli with dad

कोहलीच्या वडिलांचे निधन 19 डिसेंबर 2006 या दिवशी झाले. पण त्याच दिवशी कोहलीचा एक सामना होता. वडिलांच्या निधनानंतरही तो हा सामना खेळायला गेला होता. याबाबत कोहली म्हणाला की, " कमिटमेंट, ही गोष्ट सर्वात महत्वाची असते. तुम्ही फक्त एखादी गोष्ट करून त्याचा काही फायदा नसतो. तुम्ही एखादी गोष्ट करून काही वेळाने सोडूनही देता. पण जर कमिटमेंट असेल तर तुम्ही सातत्याने ती गोष्ट करता आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळते. जेव्हा माझे बाबा वारले तेव्हा मी दु:खी होतो. पण दुसरीकडे संघाला माझी गरज होती. त्यामुळे ती कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मला जावे लागले होते."

Web Title: Exclusive: Neither Sachin Tendulkar nor Ravi Shastri; Virat Kohli is telling the true superhero of his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.