'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला?

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:12 PM2019-09-30T12:12:37+5:302019-09-30T12:13:35+5:30

whatsapp join usJoin us
'Everybody knows how much I hate CSK': S Sreesanth shares his hatred towards MS Dhoni-led side | 'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला?

'कॅप्टन कूल' धोनीच्या CSK संघाचा तिरस्कार; एस श्रीसंत असं का म्हणाला?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआयच्या लोकपालानं श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवून ती सात वर्षांची केली आणि ही बंदी पुढील वर्षी संपणार आहे. त्यानंतर श्रीसंत कदाचित क्रिकेटमध्ये पुन्हा परतलेला पाहायला मिळेल. पण, त्याच्या मनात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाबद्दल असलेला तिरस्कार कायम राहणार आहे आणि हे श्रीसंतनेच सांगितले आहे.

2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचा सहभाग समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीशांतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली. निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीशांतने क्रिकेटमधील ‘दुस-या इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीशांत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत. 

राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असलेल्या श्रीसंतवर तत्कालीन मुख्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी टीका केली होती. श्रीसंतने हे सर्व आरोप खोडून काढले. मला चेन्नई सुपर किंगविरुद्ध खेळायचे होते, परंतु अप्टन यांनी मला संधी दिली नाही. अप्टन यांनी श्रीसंत हा उद्धट असल्याचे मत त्यांच्या आत्मचरित्रात मांडले होते. त्यावर श्रीसंत म्हणाला,''अप्टन यांनी हृदयावर व मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, की मी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोललो. दिग्गज राहुल द्रविड यांनाही मी विचारू इच्छितो की, त्यांच्याशी मी कधी वाद घातला ? मग अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात असे का म्हटले?''

तो पुढे म्हणाला,''मला चेन्नईविरुद्ध खेळू द्या, अशी विनंती मी वारंवार अप्टन यांना केली होती. मला त्यांना पराभूत करायचे होते. अप्टन यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला, मला फिक्सिंग करायची आहे, असा समज करून घेतला. मी चेन्नई सुपर किंगचा किती तिरस्कार करतो, हे सर्वांना माहित आहे. त्यामागे महेंद्रसिंग धोनी किंवा एन श्रीनिवास आहेत, असा अर्थ लोकांकडून लावला जाईल, परंतु हेही सत्य नाही. मला पिवळा रंग आवडत नाही. त्याच कारणामुळे मला ऑस्ट्रेलियाचा संघही आवडत नाही.'' 

Web Title: 'Everybody knows how much I hate CSK': S Sreesanth shares his hatred towards MS Dhoni-led side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.