Shahid Afridi : शाहिद आफ्रिदी नेपाळच्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार; काठमांडू किंग्सचे प्रतिनिधित्व करणार!

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आता नेपाळमध्ये सुरू होणाऱ्या एव्हरेस्ट प्रीमिअर लीगमध्ये खेळणार आहे. ( Everest Premier League).

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:27 PM2021-07-27T15:27:39+5:302021-07-27T15:27:57+5:30

whatsapp join usJoin us
Everest Premier League 2021: Shahid Afridi to play for Kathmandu Kings XI in the tournament | Shahid Afridi : शाहिद आफ्रिदी नेपाळच्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार; काठमांडू किंग्सचे प्रतिनिधित्व करणार!

Shahid Afridi : शाहिद आफ्रिदी नेपाळच्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार; काठमांडू किंग्सचे प्रतिनिधित्व करणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आता नेपाळमध्ये सुरू होणाऱ्या एव्हरेस्ट प्रीमिअर लीगमध्ये खेळणार आहे. ( Everest Premier League). सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगला 25 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ही लीग मार्च-एप्रिलमध्ये खेळवण्यात येणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती स्थगित करावी लागली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी काठमांडू किंग्स इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व करणआर आहे. ( Shahid Afridi featuring for the Kathmandu Kings XI ).

Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर!

शाहिद आफ्रिदीनं 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. काठमांडू किंग्ससह या लीगमध्ये सहा संघांचा समावेश असणार आहे. आफ्रिदीनं इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि बांगलादेश प्रीमिअर लीगमध्येही विविध संघांकडून प्रतिनिधित्व केले आहे.  एव्हरेस्ट प्रीमिअर लीगमध्ये एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल व हाशिम आमला हे तगडे खेळाडूही खेळणार आहेत.  

Web Title: Everest Premier League 2021: Shahid Afridi to play for Kathmandu Kings XI in the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.