चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:06 AM2019-08-13T10:06:37+5:302019-08-13T10:07:36+5:30

whatsapp join usJoin us
Erin Holland blames Yuvraj Singh after a fan questions about her wedding with Ben Cutting | चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?

चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅनडा : भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळला. या लीगदरम्यान खोडकर युवी पाहायला मिळाला. पण, एका खोडीमुळे युवीवर चक्क एका महिलेने खापर फोडले आहे. ग्लोबल ट्वेंटी-20 लीगच्या एका सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटींगची मुलाखत सुरू होती आणि ती मुलाखत त्याची होणारी पत्नी एरिन हॉलंड घेत होती. त्यावेळी युवीनं घुसखोरी करताना त्या दोघांना तुम्ही लग्न कधी करताय, असा सवाल केला होता. युवीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.


''वेळ निसटून चालली आहे, तुम्ही लवकर लग्न करा,'' असंही युवी त्यावेळी म्हणाला होता. पण, युवीचा तो सल्ला कोणी गांभीर्यानं घेईल असे वाटलेही नव्हते. ग्लोबल ट्वेंटी-20 लीगच्या दुसऱ्या पात्रता फेरीत एका चाहत्यानं पुन्हा हॉलंडला टारगेट केले. ब्रॅम्प्टन वोल्व्ह आणि विनिपेग हॉव्क्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक चाहता चक्क हातात फलक घेऊन उभा होता. त्यावर लिहीले होते की,'' ग्लोबल ट्वेंटी-20 लीगची अंतिम फेरी उद्या होणार आहे, परंतु तुम्ही लग्न कधी करणार?'' हा प्रश्न एरिन आणि बेन यांच्यासाठी होता.   


एरिनने चाहत्याच्या या प्रश्नसाठी युवीला जबाबदार धरले. युवीनंही तिच्या प्रतिक्रियेवर स्माईल दिले.  


ग्लोबल ट्वेंटी-20त कशी झाली युवराज सिंगची कामगिरी? सुपर ओव्हरमध्ये रंगली फायनल!
 युवराजने या स्पर्धेत टोरोंटो नॅशनल संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये युवीच्या टोरोंटो नॅशनल संघाला 7 सामन्यांत केवळ 3 विजय मिळता आले. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीतून ते बाहेर पडले. पण, या लीगच्या अंतिम सामना थरारक झाला. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या सामन्यात विनिपेग हॉव्क्स संघाने बाजी मारली. 


या लीगमध्ये खेळवलेल्या 22 सामन्यांत 6759 धावांचा पाऊस पडला, तर 233 विकेट्स घेण्यात गोलंदाजांना यश आले.  तब्बल 525 चौकार व 399 षटकार खेचले गेले. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप पाच फलंदाजांत जेपी ड्यूमिनी ( 332), हेनरीच क्लासेन ( 326), शैमान अनवर ( 296), ख्रिस लीन ( 295) आणि रॉड्रीगो थॉमस ( 291) यांनी स्थान पटकावले. युवराज या क्रमवारीत 16व्या स्थानी राहिला. त्यानं दुखापतीमुळे एक सामना कमी खेळला. त्यानं 6 सामन्यांत 145.71च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या. त्यात 51 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानं 11 चौकार व 10 षटकार मारले. गोलंदाजीतही त्याला 2 विकेट्स घेता आल्या.

Web Title: Erin Holland blames Yuvraj Singh after a fan questions about her wedding with Ben Cutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.