ENGW vs INDW : भारताच्या पोरींनी कमालच केली; इंग्लंडच्या हातून खेचून आणला सामना, वीरूसह अनेकांनी केलं कौतुक!

ENGW vs INDW : फॉलोऑननंतर भारतीय संघावर पराभवाचे सावट गडद झाले असताना स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी 9व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केले अन् इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:14 PM2021-06-19T23:14:20+5:302021-06-19T23:15:46+5:30

whatsapp join usJoin us
ENGW vs INDW : Sneh Rana, Taniya Bhatia help India women walk away with draw against England, Virender Sehwag applause | ENGW vs INDW : भारताच्या पोरींनी कमालच केली; इंग्लंडच्या हातून खेचून आणला सामना, वीरूसह अनेकांनी केलं कौतुक!

ENGW vs INDW : भारताच्या पोरींनी कमालच केली; इंग्लंडच्या हातून खेचून आणला सामना, वीरूसह अनेकांनी केलं कौतुक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सात वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी सामन्यात कमालीचा खेळ केला. फॉलोऑननंतर भारतीय संघावर पराभवाचे सावट गडद झाले असताना स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी 9व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केले अन् इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. या दोघांनी 185 चेंडूंत नाबाद 104 धावा करताना भारताला कसोटीच्या अखेरच्या दिवशी 8 बाद 344 धावा करून दिल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ही जोडी तोडण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आलं. ( India Women has draw the Test match in England against England, playing a Test after 7 long years, following on and they have batted 121 overs in second innings)

इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 396 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात शेफाली व स्मृती यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. शेफालीचे पदार्पणातील शतक 4 धावांसाठी हुकले. तिनं 152 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 96 धावा केल्या. स्मृतीनं 155 चेंडूंत 14 चौकारांसह 78 धावा केल्या. 167 धावांवर भारतानं पहिली विकेट गमावली अन् त्यानंतर 64 धावांत संघाचा डाव गडगडला. भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दीप्ती शर्मानं 29 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या सोफी एस्क्लेस्टननं 4 विकेट्स घेतल्या. भारताचा पहिला डाव 231 धावांवर गडगडला.

फॉलोऑन घेऊन मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला लगेच धक्का बसला. स्मृती मानधना 8 धावा करून बाद झाली. पण, शेफालीची बॅट पून्हा तळपली. तिनं 83 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 63 धावा केल्या. पदार्पणात तीन षटकार खेचणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. दीप्ती शर्मा ( 54) व पूनम राऊत ( 39) यांनी चांगला खेळ केला. पण, मिताली राज व हरमनप्रीत कौर पुन्हा अपयशी ठरल्या. स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी भारताला वाचवलं. स्नेहनं 154 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं नाबाद 80 धावा केल्या, तर तानियानं 88 चेंडूंत 44 धावा केल्या आणि हा सामना अनिर्णीत राखली. 

Web Title: ENGW vs INDW : Sneh Rana, Taniya Bhatia help India women walk away with draw against England, Virender Sehwag applause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.