इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट

१९९८साली मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.आता २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचे कमबॅक होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 18, 2020 04:37 PM2020-11-18T16:37:45+5:302020-11-18T16:38:12+5:30

whatsapp join usJoin us
England Women cricket Earn Direct Qualification In The 2022 Commonwealth Games, know about qualification process | इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट

इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१९९८साली मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. भारतासह १२ देशांनी त्यात सहभाग घेतला होता आणि दक्षिण आफ्रिकेनं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ विकेटने नमवून सुवर्णपदक नावावर केले होते. न्यूझीलंडनं कांस्यपदकाच्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. ब गटात समावेश असलेल्या भारतीय संघाला ३ पैकी एकच सामना जिंकता आल्यानं त्यांचे आव्हान गट साखळीत संपुष्टात आले होते. आता २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचे कमबॅक होत आहे. पण, यावेळी महिला क्रिकेटचा समावेश असणार आहे आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघानं यजमान म्हणून त्यांचं तिकीट आधीच पक्क केलं आहे.

२०१७च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघासह २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2022 Commonwealth Games) आठ संघ सहभाग घेणार आहेत. त्याबाबतची क्वालिफिकेशन नियम राष्ट्रकुल स्पर्धा फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) यांनी बुधवारी जाहीर केले. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा पार पडणार आहे.



यजमान इंग्लंडसह १ एप्रिल २०२१पर्यंत आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रमवारीत अव्वल सहा स्थानावर असलेल्या संघाला राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट पटकावता येणार आहे. स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल. ३१ जानेवारी २०२२ला डेडलाईन आहे.

स्पर्धेच्या पात्रता फेरीचे नियम
१ - यजमान संघ थेट पात्र
२ - आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रमवारीत १ एप्रिल २०२१पर्यंत अव्वल सहा क्रमांकावर असलेल्या संघांना प्रवेश
३ - पात्रता फेरीतून उर्वरित एखा संघाची होईल निवड
 


इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट म्हणाली,''घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल, असे स्वप्नही पाहिले नव्हते. क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची ही संधी आहे.''  

भारतीय संघ कितव्या स्थानी
सध्याच्या ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ८४३८ गुणांनुसार अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंड ( ८४०५), भारत ( ८६४०), न्यूझीलंड ( ६१९७), दक्षिण आफ्रिका ( ५९७८), वेस्ट इंडिज ( ६१२६) आणि पाकिस्तान ( ५५१६) यांचा क्रमांक येतो.
 

Web Title: England Women cricket Earn Direct Qualification In The 2022 Commonwealth Games, know about qualification process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.