England vs West Indies 1st Test: सामना इंग्लंड-वेस्ट इंडिजचा अन् नेटिझन्सना आठवतोय केदार जाधव, पण का?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला कसोटी सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:50 PM2020-07-08T15:50:48+5:302020-07-08T15:51:33+5:30

whatsapp join usJoin us
England vs West Indies 1st Test: There's light drizzle here in Southampton and the toss has been delayed; Kedar Jadhav madness needed | England vs West Indies 1st Test: सामना इंग्लंड-वेस्ट इंडिजचा अन् नेटिझन्सना आठवतोय केदार जाधव, पण का?

England vs West Indies 1st Test: सामना इंग्लंड-वेस्ट इंडिजचा अन् नेटिझन्सना आठवतोय केदार जाधव, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लागलेला ब्रेक आज दूर होणार आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला कसोटी सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे सर्वांना त्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #ENGvWI हा ट्रेंड सुरू आहे. पण, आता चाहत्यांना केदार जाधवची आठवण येऊ लागली आहे, पण का?

 कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटमध्ये बदल; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल

... तर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून मैदानावर उतरणार पाकिस्तानचा संघ!

मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झालेल्याच नाहीत. त्यामुळे इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 15-20 दिवसांपूर्वीच येथे दाखल झाला असून त्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर सरावही केला. इंग्लंडच्या खेळाडूंनीही तीन दिवसांचा सराव सामना खेळला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आतूर आहेत. पण, पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून हा कसोटी सामना सुरू होणार होता. पण, पावसामुळे अजून नाणेफेकही झालेली नाही. 


केदार जाधव आठवण्याचं कारण?
जून-जुलै 2019मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. त्यावेळी केदार जाधवच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यावर पावसाचं सावट ओढावलं होतं. त्याच वेळी महाराष्ट्रात मात्र पावसानं दडी मारली होती. तेव्हा केदारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात केदारनं पावसाची खरी गरज महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना आहे, इथे नको, महाराष्ट्रात जा अशी साद घातली होती. 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्... 

 

Web Title: England vs West Indies 1st Test: There's light drizzle here in Southampton and the toss has been delayed; Kedar Jadhav madness needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.