भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

विराट कोहली अँड टीम पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: November 18, 2020 03:45 PM2020-11-18T15:45:52+5:302020-11-18T15:46:18+5:30

whatsapp join usJoin us
England to host India for five Tests in packed summer of 2021, know full schedule | भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटला ब्रेक लागला होता. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द कराव्या लागल्या. पण, इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते सुखावले. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फेब्रुवारीनंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.  

विराट कोहली अँड टीम पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक ट्वेंटी-20 ( जून), आयसीसी वर्ल्ड कप ( ऑक्टोबर) आणि आयपीएल 2021 हे आहेच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ ट्वेंटी-20 सामने होतील. मार्च ते मे या कालावधीत आयपीएल 2021चे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

आयपीएलनंतर भारत तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर जून अखेरीस ते जुलै मध्यंतरापर्यंत श्रीलंकेतच आशिया चषक होणार आहे. जुलै महिन्यातच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन डे सामने खेळेल. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बुधवारी त्याची अधिकृत घोषणा केली.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा ( England Men's Test Series against India)
४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज
१२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, लॉर्ड्स
२५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, इमेराल्ड हेडिंग्ले 
२ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, किया ओव्हल
१० ते १४ सप्टेंबर- पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड  

इंग्लंडचा संघ १६ वर्षांनंतर पाकिस्तानात जाणार
२००५ नंतर इंग्लंडचा संघ प्रथमच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. १४ व १५ ऑक्टोबरला कराची येथे दोन ट्वेंटी-२० सामने होतील आणि १६ ऑक्टोबरला इंग्लंडचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात दाखल होईल.

 

Web Title: England to host India for five Tests in packed summer of 2021, know full schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.