Corona मुळे क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा; इंग्लंडच्या खेळाडूला वाटतेय भीती

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:48 PM2020-03-21T14:48:57+5:302020-03-21T14:51:22+5:30

whatsapp join usJoin us
England cricketer fears coronavirus pandemic could end his career svg | Corona मुळे क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा; इंग्लंडच्या खेळाडूला वाटतेय भीती

Corona मुळे क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा; इंग्लंडच्या खेळाडूला वाटतेय भीती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, सीरि ए इटालियन, चॅम्पियन्स लीग, युरो लीग आदी फुटबॉल स्पर्धांसह भारत-दक्षिण आफ्रिका, श्रीलंका- इंग्लंड, पाकिस्तान-बांगलादेश आदी क्रिकेट मालिका रद्द करण्यात आल्या. इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल 2020) 13 वे मोसम होईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यात इंग्लंडमध्ये आता 28 मे पर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूला त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. 

क्रिकेट बोर्डानं शुक्रवारी सर्व क्रिकेट स्पर्धा 28 मे पर्यंत रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे एप्रिलमध्ये सुरू होणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा लांबणीवर गेली आहे. त्याचा फटका अॅलेस्टर कूक, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडच्या अनेक खेळाडूंना बसला आहे. यापैकी काही क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काहीकाळी सक्रीय राहतील. पण, एका खेळाडूला त्याची कारकीर्द संपुष्टात येईल, याची भीती वाटू लागली आहे.

गॅरेथ बॅटी असं या खेळाडूचे नाव असून त्यानं एका टॉक शोमध्ये ही भीती व्यक्त केली. तो म्हणाला,''मी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही. मला वाटत नाही की मी पुन्हा नव्या करारावर स्वाक्षरी करू शकेन. युवा खेळाडूंसाठी चिंतेची बाब नाही. ते दुसरा काही तरी पर्याय निवडू शकतील. कोरोनामुळे घरी राहताना मानसिक कसोटीची कस लागतो. कौंटी क्रिकेट एप्रिलमध्ये सुरु होणार नाही... जून किंवा जुलैमध्येही तशी शक्यताही नाही. त्यामुळे माझी कारकीर्द आता संपल्यात जमा आहे.''


 43 वर्षीय बॅटीला सरेनं पुन्हा एका वर्षांसाठी करारबद्ध केले होते आणि 2020/21च्या मोसमानंतर बॅटी कदाचित निवृत्ती घेणार होता. पण, आता त्याला अखेरच्या मोसमातही खेळता येणार नाही. 1997मध्ये बॅटीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं 261 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 682 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं इंग्लंडकडून 9 कसोटी सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आहेत. 2003मध्ये त्यानं कसोटी पदार्पण केले, परंतु त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजेच 2016मध्ये त्यानं सघात पुनरागमन केले.  भारताविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार

'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...

OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह

Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही

Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव

Web Title: England cricketer fears coronavirus pandemic could end his career svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.