ENG vs IRE : विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लंडसमोर गुडघे टेकले; संपूर्ण संघ 23.4 षटकांत तंबूत

क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:42 PM2019-07-24T17:42:32+5:302019-07-24T17:49:59+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IRE : England skittled out for 85 by Ireland - their lowest Test total on home soil since 1997 | ENG vs IRE : विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लंडसमोर गुडघे टेकले; संपूर्ण संघ 23.4 षटकांत तंबूत

ENG vs IRE : विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लंडसमोर गुडघे टेकले; संपूर्ण संघ 23.4 षटकांत तंबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने दुबळ्या आयर्लंडसमोर गुडघे टेकले. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर आजपासून सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली. वयाच्या 38व्या वर्षी तिसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. विशेष म्हणजे मुर्ताघचा जन्म हा लंडनचाच आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यानं घरच्याच संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. इंग्लंडचा संपूर्ण संघ 23.4 षटकांत 85 धावांत तंबूत परतला. 


या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते 116 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जेसन रॉयकडे. रॉयचा हा पहिलाच कसोटी सामना होता, परंतु त्याला अपेक्षांवर खरे उतरता आले नाही.  अवघ्या पाच धावा करून तो माघारी परतला. टीम मुर्ताघने पदार्पणाच्या सामन्यात रॉयची विकेट घेतली. मुर्ताघने त्यानंतर इंग्लंडला धक्के देण्याचे सत्र सुरूच ठेवले. त्यानं जोस बर्न ( 6), जॉनी बेअरस्टो ( 0), मोईन अली ( 0) आणि ख्रिस वोक्स ( 0) यांनाही बाद केले.  लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिल्याच कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो 64वा गोलंदाज ठरला आहे. या कामगिरीनंतर त्याचे नाव लॉर्ड्सच्या हॉनर बोर्डावर लिहिले गेले आहे. त्याला मार्क एडेर ( 3) आणि बॉयड रँकिन ( 2) यांनी उत्तम साथ दिली. 

रँकिनने इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. 6 फुट 7 इंच इतकी उंची असलेला रँकिन डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. 5 जुलै 1984 मध्ये लंडन येथे त्याचा जन्म झाला होता. त्याने 2014 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्या एकमेव कसोटीत त्यानं 13 धावा देत एक विकेट घेतली होती. 

Web Title: ENG vs IRE : England skittled out for 85 by Ireland - their lowest Test total on home soil since 1997

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.