धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

धोनी खेळणार नसेल तर मीदेखील खेळणार नाही, रैना याचं वक्तव्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:59 AM2021-07-11T06:59:57+5:302021-07-11T07:01:02+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni will not play in IPL 2022 said suresh Raina | धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधोनी खेळणार नसेल तर मीदेखील खेळणार नाही, रैना याचं वक्तव्य.

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या २०२२ च्या पर्वात खेळताना दिसणार नाही. संघाच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ सुरेश रैना याने हे मोठे वक्तव्य केले. ‘सीएसकेने २०२१ चे आयपीएल जिंकल्यास मी धोनीला पुढच्या पर्वात खेळण्यास भाग पाडेन,’ असेही रैना म्हणाला. याचा अर्थ असा की पराभूत होताच धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.‘

‘माझ्याकडे पाच वर्षे आहेत. मी आणखी चार- पाच वर्षे क्रिकेट खेळू शकेन. आयपीएलच्या पुढच्या पर्वामध्ये दोन संघांची भर पडणार आहे. मी मात्र जोपर्यंत आयपीएलमध्ये असेल तोपर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत राहणार आहे,’ असे सुरेश रैनाने स्पष्ट केले. कोरोनामुळे यंदाच्या वर्षी मे महिन्यात आयपीएल मध्यावरच थांबविण्यात आली. आता उर्वरीत ३१ सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळविण्यात येणार आहेत. यंदाच्या मोसमात जबरदस्त लयमध्ये असलेला  सीएसके संघ गुणतालिकेत दिल्लीपाठोपाठ द्वितीय स्थानी असून  आरसीबी व मुंबई अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

‘धोनी खेळणार नसेल तर मीदेखील खेळणार नाही’
एका वाहिनीशी बोलताना रैना म्हणाला,‘धोनीभाई पुढच्या पर्वात खेळणार नसेल तर मी देखील खेळणार नाही. मी २००८ पासून माहीसोबत खेळत आहे. आम्ही सोबतच आयपीएल सोडणार! सीएसके २०२१ च्या पर्वात जिंकला तरी मी धोनीला कायम राहण्याची विनंती करेन. मी देखील कायम असेल.’ धोनी आणि रैना यांनी एकाचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. २०२० ला यूएईत झालेल्या आयपीएलमधून कोरोना काळात रैनाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती.

Web Title: Dhoni will not play in IPL 2022 said suresh Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.