Despite being in the World Cup squad, he not selected for west indies tour | विश्वचषकाच्या संघात असूनही 'त्याला' मिळाला डच्चू
विश्वचषकाच्या संघात असूनही 'त्याला' मिळाला डच्चू

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी आज भारताच्या संघांची निवड करण्यात आली. यावेळी तिन्ही संघांचे कर्णधारपद विराट कोहलीला देण्यात आले आहेत. पण या संघात विश्वचषकातील एका खेळाडू स्थान देण्यात आलेले नाही. हा निर्णय घेत निवड समितीने साऱ्यांनाच मोठा धक्का दिला आहे.

विश्वचषकात जेव्हा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला तेव्हा रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. त्यावेळी अंबाती रायुडूचा विचार निवड समितीने केला नाही. त्यानंतर जेव्हा विजय शंकर दुखापतग्रस्त झाला तेव्हा मयांक अगरवालला संघात स्थान देण्यात आले. मयांकची जेव्हा निवड करण्यात आली तेव्हा निवड समितीवर टीका झाली होती. आता तर निवड समितीने मयांकलाच संधी दिलेली नाही. त्यामुळे विश्वचषकाच्या वेळी निवड समितीने घेतलेला निर्णय योग्य होता की यावेळी घेतलेला, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

तब्बल दीड वर्षांनी त्याने भारतीय संघात केले पुनरागमन
मुंबई : भारतीय संघाची आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी निवड करण्यात आली. यावेळी काही जणांना डच्चू मिळाला तर काहींना नव्याने संधी मिळाली. पण या संघात एका खेळाडूला चक्क दीड वर्षांनी संघात स्थान मिळाले आहे. आता हा खेळाडू नेमका कोण, याचा विचार तुम्ही करत असाल.

या मालिकेमध्ये आपण खेळणार नसल्याचे विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निवड समितीला कळवले होते. पण कोहलीने मात्र आपण या मालिकांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. धोनी संघात नसताना रिषभ पंतला संघात यष्टीरक्षक म्हणून कायम राहीला. पण दिनेश कार्तिकला मात्र संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे कार्तिकची कारकिर्द धोक्यात आल्याचे आता म्हटले जात आहे.

या मालिकांमध्ये खेळणार नसल्याचे धोनीने सांगितले होते. त्यामुळे ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात पंतची निवड करण्यात आली. पण कसोटी संघात मात्र पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. ही जबाबदारी वृद्धिमान साहाकडे सोपवण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षांनी साहाने संघात पुनरागमन केले होते. दीड वर्षांपूर्वी साहाला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे आता त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन मालिकांसाठी आज भाताचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. पण विश्वचषकातील पराभवानंतर विराटचे धाबे दणाणले आणि त्याने या मालिकांमध्ये खेळायचा निर्णय घेतला. पण धोनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहीला. धोनी नसल्यामुळे रीषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज भाष्य केले आहे.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन  टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून रीषभ पंतची निवड करण्यात आली आहे.


Web Title: Despite being in the World Cup squad, he not selected for west indies tour
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.