IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:34 PM2021-03-20T16:34:53+5:302021-03-20T16:36:09+5:30

whatsapp join usJoin us
Delhi Capitals CEO said they've made a request to the BCCI to get players vaccinated before the IPL | IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. पण, आयपीएलपूर्वी खेळाडूंना कोरोना लस देण्यात यावी, अशी विनंती दिल्ली कॅपिटल्सनं BCCI ला केली आहे. (  IPL franchise Delhi Capitals has a request for BCCI: Vaccinate players ASAP). दिल्ली कॅपिटल्सचे ( DC) CEO विनोद बिश्त ( CEO Vinod Bisht ) यांनी ANI दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत आयपीएलच्या १४व्या पर्वाचे सामने होणार आहेत. त्यामुळे खेळाडू जेव्हा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतील तेव्हा खेळाडूंना कोरोना लस द्यावी, अशी विनंती विनोद बिश्त यांनी केली. ( request to the BCCI to get players vaccinated before the IPL) 

आयपीएल २०२१ मध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. एकूण ५६ सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी १० सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी ८ सामने होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला ६ स्टेडियमपैकी ४ स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल. आयपीएल २०२१ मध्ये ११ डबल हेडर असतील. म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडे तीन वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरू होतील. IND vs ENG, 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू द्या, मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा - मायकेल वॉन    

''कोरोना व्हायरसच्या संकटातही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंना एका शहरातून दुसरीकडे प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना कोरोना लस देण्यात यावी अशी विनंती मी BCCIकडे करत आहे. मला खात्री आहे की, BCCI यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करत असेल आणि त्यांच्याकडे कोरोना लसीबाबत विनंती केली असेल,''असे बिश्त यांनी सांगितले.   फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार?

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) २.२ कोटी, उमेश यादव (Umesh Yadav) १ कोटी, रिपाल पटेल ( Ripal Patel) २० लाख, विष्णू विनोद ( Vishnu Vinod) २० लाख, लुकमन मेरिवाला ( Lukman Meriwala) २० लाख, एम सिद्धार्थ ( M Siddharth) २० लाख, टॉम कुरन ( Tom Curran) ५.२५ कोटी, सॅम बिलिंग (Sam Billings) २ कोटी.

Web Title: Delhi Capitals CEO said they've made a request to the BCCI to get players vaccinated before the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.