BCCIचा खोटारडेपणा उघड, दीपक चहरची हॅटट्रिक ठरली अवैध!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 02:24 PM2019-11-13T14:24:39+5:302019-11-13T14:25:08+5:30

whatsapp join usJoin us
Deepak Chahar missed out on one more hat-trick; he bowled a wide ball between two dismissals in the Syed Mushtaq Ali Trophy game against Vidarbha | BCCIचा खोटारडेपणा उघड, दीपक चहरची हॅटट्रिक ठरली अवैध!

BCCIचा खोटारडेपणा उघड, दीपक चहरची हॅटट्रिक ठरली अवैध!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी 2012मध्ये भारताच्या एकता बिश्तनं श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवली होती. या कामगिरीनंतर चहरनं पुन्हा एक हॅटट्रिक नोंदवली, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केला होता. पण, त्यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला असून चहरची हॅटट्रिक अवैध ठरली आहे. 

लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी   वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे ( 3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर दीपक चहरनं मंगळवारी आणखी एका हॅटट्रिकची नोंद केली. 

मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं हॅटट्रिक घेतल्याचा दावा बीसीसीआयनं केला. त्यानं विदर्भ संघाविरुद्ध 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थाननं प्रतिस्पर्धी विदर्भला 13 षटकांत 9 बाद 99 धावांत रोखलं. पण, त्यानं दोन विकेट्सच्या मध्ये एक वाईड बॉल टाकला होता आणि याची शहानिशा न करता बीसीसीआयनं चहरनं हॅटट्रिक घेतली असे ट्विट केले होते.


चहरला पहिल्या दोन षटकांत एकही विकेट घेता आली नाही. पण, त्यानं तिसऱ्या षटकात चार विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या चेंडूवर रुषभ राठोडला ( 3) बाद केले. त्यानंतर दर्शन नलकांडे ( 0), श्रीकांत वाघ ( 13) आणि अक्षय वाडकर ( 0) यांना माघारी पाठवले. पण, नलकांडे व वाघ यांच्या विकेटमध्ये त्यानं एक वाईड बॉल टाकला.

ट्वेंटी-20तील कोणता विक्रम मोडला
श्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला
6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 2019
6/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 2012
6/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 2011
6/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017
रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दीपक चहरनं 10 धावांत 8 विकेट्स घेतल्या होत्या ( हैदराबाद) 

Web Title: Deepak Chahar missed out on one more hat-trick; he bowled a wide ball between two dismissals in the Syed Mushtaq Ali Trophy game against Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.