DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीने केली आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी

DC vs KXIP Latest News : 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 10:19 PM2020-09-20T22:19:36+5:302020-09-20T22:20:03+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News: Mohammad Shami's best performance in IPL | DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीने केली आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी

DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीने केली आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आपल्या स्विंगच्या जोरावर भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या मोहम्मद शमीने दुबईत रविवारी आयपीएलमधील आपली सर्वोत्तम कामगीरी केली. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिल्ली कॅपीटल्सचे  १५ धावांत तीन बळी घेतले. शमीनने २०१९ च्या सत्रातही मुंबईचे ३ बळी घेतले होते. मात्र तेव्हा त्याने २१ धावा मोजल्या होत्या. शमीचा हा आयपीएलमधील ५० वा सामना होता. हा सामना त्याने शानदार कामगिरी करत साजरा केला.

शमीने या सामन्यात श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायेर आणि पृथ्वी शॉ यांना बाद केले.  रवि बिश्नोईने पंतला केल्यावर लगेचच शमीने अय्यरला तंबूत परतवले आणि दिल्लीच्या फलंदाजी आक्रमणाची धार बोथट केली. स्टॉयनिसच्या अखेरच्या षटकातील तुफानी खेळामुळेच दिल्लीला दीडशतकी मजल मारता आली. 

शमीची आयपीएलमधील कामगिरी
एकुण सामने ५०
सर्वोत्तम कामगिरी
३/१५ विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स दुबई , २०२०
३/२१ विरुद्ध मुंबई इंडियन्स मुंबई,२०१९
२/१७ विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मोहाली, २०१९

Web Title: DC vs KXIP Latest News: Mohammad Shami's best performance in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.