Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन!

भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:26 PM2021-03-15T13:26:06+5:302021-03-15T13:37:58+5:30

whatsapp join usJoin us
On this day, 2001: When Dravid, Sachin poured champagne on teammates after historic Kolkata Test win, Video | Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन!

Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. पण, त्यानंतर कोलकाता कसोटीत टीम इंडियानं केलेलं कमबॅक हे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याच्यासाठी धक्का देणारं ठरलं. ऑस्ट्रेलियाची सलग १६ कसोटी सामन्यांतील अपराजित मालिका टीम इंडियानं खंडीत केली होती. जसप्रीत बुमराहसाठी आजचा दिवस आहे खास; गोव्यात अडकणार विवाह बंधनात    

ऑस्ट्रेलियां प्रथम फलंदाजी करताना ४४५ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार स्टीव वॉनं ११० आणि मॅथ्यू हेडननं ९७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात हरभजन सिंगनं ( Harbhajan Singh's hat-trick ) हॅटट्रिक घेतली होती आणि कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता. तरीही कागांरूंनी मोठी धावसंख्या उभारली.  सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

भारताचा पहिला डाव १७१ धावांवर गुंडाळून ऑसींनी २७४ धावांची आघाडी घेत यजमानानं फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ४ फलंदाज २३२ धावांत माघारी परतले होते. पण, व्हीव्हीएस लक्ष्मण ( २८१) आणि राहुल द्रविड ( १८०)  ( VVS Laxman - Rahul Dravid ) ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि सामन्याचे चित्रच बदललं. ओए चारो तरफ घुम के बॅट दिला; विराट कोहली मैदानावर इशान किशनकडे बघून ओरडला, Video


या जोडीनं संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला. कर्णधार वॉ आणि यष्टिरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांनीही गोलंदाजी करून पाहिली. भारतानं दुसरा डाव ७ बाद ६५७ धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २१२ धावांत गुंडाळून टीम इंडियानं १७२ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यानंतर चेन्नई कसोटी जिंकून टीम इंडियानं मालिका खिशात घातली. इडन गार्डनवरील ऐतिहासिक विजयानंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि गांगुली यांनी ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
पाहा व्हिडीओ... 

Web Title: On this day, 2001: When Dravid, Sachin poured champagne on teammates after historic Kolkata Test win, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.