सनरायझर्स हैदराबाद केन विलियम्सला रिलीज करणार? कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं स्पष्ट केली भूमिका

मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार, वृद्घीमान साहा अशी दुखापतग्रस्तांची संख्या वाढूनही SRHनं जबरदस्त कमबॅक केले.

By स्वदेश घाणेकर | Published: November 15, 2020 11:12 AM2020-11-15T11:12:59+5:302020-11-15T11:13:30+5:30

whatsapp join usJoin us
David Warner Assures Hyderabad Will Not Be Releasing Kane Williamson Next Season | सनरायझर्स हैदराबाद केन विलियम्सला रिलीज करणार? कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं स्पष्ट केली भूमिका

सनरायझर्स हैदराबाद केन विलियम्सला रिलीज करणार? कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं स्पष्ट केली भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबादचे आव्हान क्वालिफायर 1 मध्ये संपुष्टात आले असले तरी त्यांच्या खेळाचे सर्वांनी कौतुक केलं. मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार, वृद्घीमान साहा अशी दुखापतग्रस्तांची संख्या वाढूनही SRHनं जबरदस्त कमबॅक केले. डेव्हिड वॉर्नर व केन विलियम्सन यांच्या लढाऊ वृत्तीनं SRHनं हे कमबॅक केले. केनला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते, परंतु त्यानंतर मैदानावर उतरलेल्या केननं संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. पण, आयपीएल 2021च्या लिलावात केनला रिलीज करण्याची चर्चा सुरु झाली आहे. 

आयपीएल 2020च्या यशस्वी आयोजनानंतर BCCI आता पुढील वर्षाच्या आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात IPL 2021 Auctionबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या लीगमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहेत. आयपीएल 2021 लिलावाला काही संघांचा विरोध आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब संघांसाठी लिलाव फायद्याचा ठरेल. त्यात SRH केनला रिलीज करणार का, असा सवाल एका फॅन्सनं डेव्हिड वॉर्नरला विचारला. त्यावर वॉर्नरनं, केनला आम्ही गमावणार नाही, असे उत्तर दिले.
 

केन विलियम्स, डेव्हिड वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाची IPL 2020मधील कामगिरी
सुरुवातीचे काही सामने मुकणाऱ्या केननं SRHसाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. त्यानं 12 सामन्यांत 317 धावा केल्या. एलिमिनेटर सामन्यात RCBविरुद्ध त्यानं महत्त्वाची अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली SRHनं 2016साली जेतेपद जिंकले. वॉर्नरनं 16 सामन्यांत 548 धावा चोपल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो परदेशी खेळाडू ठरला. SRHनं 14 सामन्यांत 7 विजयांसह 14 गुणांची कमाई केली.   

 

Web Title: David Warner Assures Hyderabad Will Not Be Releasing Kane Williamson Next Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.