CSK vs KXIP Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी निरोप, पण किंग्स इलेव्हन पंजाबचंही पॅकअप!

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 1, 2020 07:13 PM2020-11-01T19:13:37+5:302020-11-01T19:14:43+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KXIP Latest News : Chennai Super Kings has booked return flight for Kings XI Punjab, they won by 9 wickets | CSK vs KXIP Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी निरोप, पण किंग्स इलेव्हन पंजाबचंही पॅकअप!

CSK vs KXIP Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी निरोप, पण किंग्स इलेव्हन पंजाबचंही पॅकअप!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. IPL 2020च्या प्ले ऑफमधून बाद झालेल्या CSKनं विजयाची हॅटट्रिक साजरी करताना KXIPचे आव्हानही संपुष्टात आणले. प्ले ऑफच्या सामन्यात आव्हान कायम ठेवण्यासाठी KXIPला हा सामना जिंकणे गरजेचे होते, परंतु आता त्यांचेही पॅकअप झाले. करा किंवा मरा या सामन्यात पंजाबचे महत्त्वाचे खेळाडूच अपयशी झाले आणि त्याचा मोठा भुर्दंड त्यांना भरावा लागला. CSKनं IPL2020चा विजयानं निरोप घेतला. ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKचा विजय पक्का केला. 

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी KXIPला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर फटका मारताना अग्रवालच्या बॅटला लावून चेंडू यष्टिंवर आदळला. अग्रवाल १५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं २६ धावांवर माघारी परतले. ९व्या षटकात एनगिडीनं KXIPला दुसरा धक्का दिला. लोकेश राहुल २९ धावांवर त्रिफळाचीत झाला. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात निकोलस पूरनला (२) बाद केलं. ख्रिस गेलही ( १२) आज करिष्मा दाखवू शकला नाही. इम्रान ताहीरनं त्याला पायचीत केलं. 

मनदीप सिंग आणि दीपक हुडा हे चांगल्या टचमध्ये दिसले. संघातील अनुभवी व दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतर ही युवा जोडी KXIPला सावरण्यासाठी पुढे आली. दोघांनी काही सुरेख फटकेही मारले, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना मोठी खेळी करू दिली नाही. मनदीप (१४) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या जिमी निशॅमचा अफलातून झेल ऋतुराज गायकवाडनं पकडला. KXIPसाठी हा मोठा धक्का ठरला. दीपक हुडानं एका बाजूनं फटकेबाजी करताना २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या फटकेबाजीनं KXIPला २० षटकांत ६ बाद १५३ असा समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला. 

प्रत्युत्तरात CSKचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. रवी बिश्नोईनं टाकलेल्या ८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गायकवाड बॅकवर्ड पॉईंटला झेलबाद झाला. मनदीप सिंगनं झेल टिपला आणि मैदानावरील पंचानी त्याला बाद दिले. पण, त्या झेलबद्दल थोडा डाऊट वाटत असल्यानं त्यांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यात तिसऱ्या पंचांनी गायकवाडला नाबाद ठरवले. या निर्णयावर लोकेश राहुल व अनिल कुंबळे यांनी नाराजी व्यक्त केली. पण, ख्रिस जॉर्डननं KXIPला पहिलं यश मिळवून दिलं. फॅफ ३४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ४८ धावांवर माघारी परतला.

पण, गायकवाड एका बाजूने खेळपट्टीवर नांगर रोवून होता. त्यानं ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. गायकवाडचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. चेन्नईकडून सलग तीन अर्धशतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. गायकवाड ४९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६२ धावावंर, तर रायुडू ३० धावांवर नाबाद राहिला. या पराभवानंतर पंजाबचे १४ सामन्यानंतर १२ गुण झाले आहेत, त्यांचा नेट रन रेट -०.१६२ असा आहे. चेन्नई १२ गुणांसह तळावरच राहिले. 

Web Title: CSK vs KXIP Latest News : Chennai Super Kings has booked return flight for Kings XI Punjab, they won by 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.