CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछूट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,पण...

By स्वदेश घाणेकर | Published: October 4, 2020 11:06 PM2020-10-04T23:06:39+5:302020-10-04T23:14:51+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KXIP Latest News : 181 runs, Shane Watson and Faf Du Plessis recorded highest ever partnership for Chennai Super Kings in IPL history | CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम

CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछूट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी सुरुवातही तशीच करून दिली. पंजाबनं CSKसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण, आजचा दिवस CSKचा ठरला. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKच्या विजय पक्का केला.

लोकेश राहुल व मयांक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. पीयूष चावलानं ही भागीदारी तोडली. त्यानं मयांकला २६ धावांवर माघारी पाठवले. करुण नायरच्या जागी संघात मनदीप सिंगला स्थान देण्यात आले होते आणि त्यानं दोन खणखणीत षटकार मारून त्याची निवड सार्थ असल्याचे दाखवले. मात्र, त्याला रवींद्र जडेजाच्या फिरकीचा अंदाज बांधता आला नाही. अंबाती रायुडूच्या हाती झेल देत मनदीप २७ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन आणि लोकेश यांनी दमदार फटकेबाजी करून KXIPचा डाव रुळावर आणला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. 

शार्दुल ठाकूरने ( Shardul Thakur) एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. सुरुवातीला त्यानं पूरनला बाद केले. पूरननं टोलावलेला चेंडू उत्तुंग उडाला, परंतु रवींद्र जडेजानं तो सुरेखरित्या झेलला. पुढच्याच चेंडूवर धोनीनं चपळतेनं लोकेशचा झेल टिपला आणि एका विक्रमाला गवसणी घातली. पूरनने १७ चेंडूंत ३ षटकारांसह ३३ धावा, तर लोकेशनं ५२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६३ धावा केल्या. आयपीएलमधील MS Dhoniने यष्टिरक्षक म्हणून १००वा झेल घेतला. दिनेश कार्तिकनंतर हा पल्ला गाठणारा तो दुसरा यष्टिरक्षक आहे. सुरेश रैनानेही खेळाडू म्हणून १०० झेल टिपले आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबला ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. 

CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. फॉर्माशी लडखडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच. आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला. या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. 162वी धाव घेताच या दोघांनी CSKकडून सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. 2011 मध्ये माईक हसी/मुरली विजय यांनी RCBविरुद्ध 159 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम आज वॉटसन-ड्यु प्लेसिस जोडीनं तोडला. 

Web Title: CSK vs KXIP Latest News : 181 runs, Shane Watson and Faf Du Plessis recorded highest ever partnership for Chennai Super Kings in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.