ठरलं! काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला हरवण्यासाठी भाजपामध्ये जाणार 'हा' क्रिकेटपटू, मतदारसंघही ठरला...

काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला आपल्याला पराभूत करायचे आहे, त्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, असे या खेळाडूने स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:10 PM2019-09-30T17:10:35+5:302019-09-30T17:13:16+5:30

whatsapp join usJoin us
This 'Cricketer', who will go to BJP to defeat big Congress leader | ठरलं! काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला हरवण्यासाठी भाजपामध्ये जाणार 'हा' क्रिकेटपटू, मतदारसंघही ठरला...

ठरलं! काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला हरवण्यासाठी भाजपामध्ये जाणार 'हा' क्रिकेटपटू, मतदारसंघही ठरला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सध्याच्या घडीला देशामध्ये निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभेच्या निवडणूका महिन्याभरात होणार आहेत. या निवडणूकी पाहून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपल्या पक्षामध्ये एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने प्रवेश दिला आहे.

भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला दिल्लीमधून सीट दिली होती. गंभीर यावेळी निवडणून येऊन खासदारही झाला आहे. आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका खेळाडूने भाजपामध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला आपल्याला पराभूत करायचे आहे, त्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, असे या खेळाडूने स्पष्ट केले आहे.

भाजपामध्ये प्रवेश झाल्यावर आपण निवडणूक कधी लढायची, हेदेखील या खेळाडूने ठरले आहे. आपण कोणत्या मतदाकसंघातून कधी, केव्हा आणि कोणाविरोधात लढायचे, हे या क्रिकेटपटूने ठरवले आहे. काँग्रेस हा एक बडा नेता आहे. त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी भाजपा या क्रिकेटपटूला आपल्या पक्षात सामील करून काँग्रेसच्या बड्या नेत्यापुढे उभी करू शकते.

आपल्याला भाजपामध्ये प्रवेश करायचा आहे, हे भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने ठरवले आहे. सध्याच्या घडीला श्रीसंतवर 2020 सालापर्यंत बंदी आहे. पण त्यानंतर 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी श्रीसंतला तिरुवनंतपुरम येथून लढायचे आहे. तिरुवनंतपुरम हा शशि थरूर यांचा मतदार संघ आहे आणि श्रीसंतला थरूर यांनाच पराभूत करायचे आहे.

एस श्रीसंत

भारताला ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तला भाजपाने आपल्या पक्षामध्ये  भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगलाही भाजपाने आज सामील करून घेतले आहे. हरयाणामध्ये हॉकीचे प्रचंड वेड आहे. संदीप तर भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हरयाणामध्ये चांगला मान आहे. त्यामुळे जर संदीप निवडणूकीसाठी उभा राहीला तर तो जिंकून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाने आपल्या पक्षात संदीपला जागा दिल्याचे म्हटले जात आहे.
सामील करून घेतले आहे. योगेश्वरने आतापर्यंत कुस्ती विश्वामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याच्या चरित्रावर कोणाताही डाग नाही. कोणत्याही वादामध्ये योगेश्वर अडकलेला नाही. त्यामुळे योगेश्वरची निवड भाजपाने केली असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: This 'Cricketer', who will go to BJP to defeat big Congress leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.