धोनीला विचारण्यात आलं, पुढच्या वर्षी IPL खेळणार? माहीनं बोटांवर महिने मोजायला सुरुवात केली...

धोनी पुढच्या वर्षी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? पिवळ्या जर्सीत माही चमत्कार करणार? आणि तो आयपीएलचा पुढचा सीझन खेळणार? पुन्हा एकदा असाच प्रश्न त्याच्यासमोर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 06:43 PM2021-11-20T18:43:23+5:302021-11-20T18:46:40+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer MS dhoni says he will think about participation in IPL 2022 | धोनीला विचारण्यात आलं, पुढच्या वर्षी IPL खेळणार? माहीनं बोटांवर महिने मोजायला सुरुवात केली...

धोनीला विचारण्यात आलं, पुढच्या वर्षी IPL खेळणार? माहीनं बोटांवर महिने मोजायला सुरुवात केली...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई - जेव्हा-जेव्हा IPL 2022 चा उल्लेख येतो, तेव्हा-तेव्हा चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, धोनी पुढच्या वर्षी अ‍ॅक्शनमध्ये दिसेल? पिवळ्या जर्सीत माही चमत्कार करणार? आणि तो आयपीएलचा पुढचा सीझन खेळणार? पुन्हा एकदा असाच प्रश्न त्याच्यासमोर होता. चेन्नईत एका कार्यक्रमादरम्यान धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा काय होती 'थाला धोनी'ची रिअ‍ॅक्शन, जाणून घ्या...

'विचार करायला आणखी बराच वेळ' -
नेहमीच आपल्या मस्तीत मग्न असलेल्या माहीने हा प्रश्न असा टाळला, जणू तो सामन्यादरम्यान दबावाच्या स्थितीत आहे. धोनी म्हणाला, आयपीएल 2022 सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळली जाणार आहे. सध्या नोव्हेंबर सुरू आहे. मला त्यावर विचार करावा लागेल. मला घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही.

'माझ्यापेक्षा संघ महत्वाचा' - 
याच वेळी, धोनीने चेन्नई सुपर किंग्सबद्दलही काळजी व्यक्त केली. सीएसकेची भलाई हेच आमचे प्राधान्य असल्याचे तो म्हणाला. मी कोणत्या भूमिकेत असेल, याने काहीही फरक पडत नाही. पुढील 10 वर्षे फ्रँचायझीसोबत असेल, अशी कोर टीम तयार करणे महत्त्वाचे आहे. संघ कोणत्याही कारणाने अडचणीत येऊ नये, त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, असेही धोनी म्हणाला.

आशा आहे, की माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत होईल -
याशिवय, इंडिया सिमेंटच्या 75व्या वर्षपूर्ती निमित्त चेन्नईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले होते. त्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आयपीएल 2021च्या जेतेपदाचा आनंदही साजरा केला गेला. यावेळी CSKच्या खेळाडूंचा गौरवही करण्यात आला. यावेळी जय शाह यांनी आयपीएल 2022 भारतातच होणार असल्याचे जाहीर केले. याचवेळी, आशा आहे, की माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत होईल. मग ते पुढच्या वर्षी असो वा पाच वर्षांनंतर, असेही धोनी म्हणाला.


 

Web Title: Cricketer MS dhoni says he will think about participation in IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.