Milestone : 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा ट्वेंटी-20त विश्वविक्रम; कोहली, रोहित प्रचंड पिछाडीवर

कॅरेबियन प्रीमिअर लीग : जमैका थल्लावाज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:42 AM2019-09-16T10:42:32+5:302019-09-16T10:42:55+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2019 : Another milestone for universe boss Chris Gayle; complete 13000 runs in T20 | Milestone : 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा ट्वेंटी-20त विश्वविक्रम; कोहली, रोहित प्रचंड पिछाडीवर

Milestone : 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा ट्वेंटी-20त विश्वविक्रम; कोहली, रोहित प्रचंड पिछाडीवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जमैका, कॅरेबियन प्रीमिअर लीग : जमैका थल्लावाज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ट्रायडंट संघाचे 141 धावांचे लक्ष्य जमैका संघाने 18.3 षटकांत सहज पार केले. यंदाच्या कॅरेबिनय प्रीमिअर लीगमधील जमैकाचा हा पहिलाच विजय ठरला. या सामन्यात युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलनं वर्ल्ड रेकॉर्ड केला. ट्वेंटी-20 तील या विक्रमाच्या शर्यतीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे प्रचंड पिछाडीवर आहेत. गेलनं नेमका असा कोणता विक्रम नोंदवला, ते जाणून घेऊया...


ट्रायडंट्स संघाने जेपी ड्युमिनी ( 31) आणि अॅश्ली नर्स ( 37) यांच्या खेळीच्या जोरावर 9 बाद 140 धावा केल्या. जमैकाच्या जॉर्ज वॉर्कर ( 2/16), रामाल लुईस ( 2/23) आणि झहीर खान ( 3/20) यांच्या गोलंदाजीसमोर ट्रायडंट्सला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. प्रत्युत्तरात गेल व ग्लेन फिलिप्स यांनी 48 धावांची सलामी दिली. जेसन होल्डरने या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. गेलनं 19 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह 22 धावा केल्या. त्याच्या याच 22 धावांनी आणखी एक वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. 

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. गेलनं 381 डावांत 39.07 च्या सरासरीनं आणि 147.55 च्या स्ट्राईक रेटनं 13013 धावा केल्या आहेत. त्यात सर्वाधिक 22 शतकांचा आणि 80 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय गेलनं ट्वेंटी-20 1001 चौकार खेचले आहेत. अशी कामगिरी करणाराही तो पहिलाच फलंदाज आहे. त्याच्या नावावर 958 षटकार आहेत. षटकारांच्या बाबतीतही गेल अव्वल स्थानावर आहे. 


ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांच्या बाबतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीरोहित शर्मा अनुक्रमे सहाव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. कोहलीनं 255 डावांत 8475 धावा केल्या आहेत आणि त्यात 5 शतकं व 61 षटकारांचा समावेश आहे. रोहितनं 303 डावांत 6 शतकं व 56 अर्धशतकांसह 8291 धावा केल्या आहेत.

Web Title: CPL 2019 : Another milestone for universe boss Chris Gayle; complete 13000 runs in T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.