कोरोनाने वाढवली कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा

मागील सहा वर्षात त्याने सुरुवातीच्या तिसऱ्या सामन्यातच शतक झळकावले होते. मात्र कोरोनामुळे भारतीय कर्णधाराच्या शतकासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:18 AM2020-03-20T05:18:42+5:302020-03-20T05:19:09+5:30

whatsapp join usJoin us
Corona raises Virat Kohli's wait for century | कोरोनाने वाढवली कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा

कोरोनाने वाढवली कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : विराट कोहलीला वर्षाच्या सुरुवातीला धावा करताना चांगलेच झुंजावे लागत आहे. मागील सहा वर्षात त्याने सुरुवातीच्या तिसऱ्या सामन्यातच शतक झळकावले होते. मात्र कोरोनामुळे भारतीय कर्णधाराच्या शतकासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
कोहलीने यावर्षी कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यात मिळून एकूण १६ डाव खेळले आहेत. यात ८९ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१० नंतर प्रथमच कोहलीला दोन महिन्यात एकही शतक करता आलेले नाही.

2020 मध्ये कोहलीने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध तीन टी२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर न्यूझीलंड दौºयात त्याने चार टी२०, तीन एकदिवसीय सामने व दोन कसोटीत फलंदाजी केली. या १६ सामन्यात त्याला ३०.४६च्या सरासरीने केवळ ४५७ धावा करता आल्या आहेत. यात त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

कोहलीला आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपला फॉर्म परत मिळवण्याची संधी होती. मात्र कोरोना विषाणूमुळे ही मालिका रद्द करण्यात आली. आयसीसीच्या दौ-यानुसार भारत जून-जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने व ३ टी२० सामने खेळेल. ऑगस्टमध्ये भारत झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार असून त्यानंतर आशिया चषक स्पर्धा होईल."

कोहलीने २०१० ते २०१९ या १० वर्षांत ८ वेळा जानेवारीत झालेल्या सामन्यातच शतक केले आहे. २०११ व २०१३ या दोन वर्षीच त्याला शतकाठी फेबु्रवारीची वाट पहावी लागली. कोहलीने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतक केले आहेत. यातील सर्वाधिक ३६ शतके त्याने मागील चार वर्षात केली आहेत. २०१७ ते १८ या काळात त्याने ११ शतके केली, मात्र २०२० च्या सुरुवातीला त्याला शतक करता आलेले नाही.

Web Title: Corona raises Virat Kohli's wait for century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.