प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मुद्दाम ट्रोल केले जात आहे - विराट कोहली

भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत केली, हे विशेष.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 04:45 AM2019-12-01T04:45:59+5:302019-12-01T04:50:01+5:30

whatsapp join usJoin us
Coach Ravi Shastri is being trolled deliberately - Virat Kohli | प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मुद्दाम ट्रोल केले जात आहे - विराट कोहली

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मुद्दाम ट्रोल केले जात आहे - विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : रवी शास्त्री यांना सातत्याने ट्रोल करण्याचा अजेंडा राबविला जात आहे, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारतीय प्रशिक्षक कर्णधाराच्या सुरात सूर मिसळतात, अशी त्यांच्यावर टीका होत आहे.
कोहली म्हणाला की, शास्त्री यांनी कारकिर्दीत हेल्मेटविना धैर्याने वेगवान गोलंदाजांना तोंड दिले आहे आणि सलामीवीर म्हणून त्यांची सरासरी ४१ ची आहे. हे सध्याच्या प्रशिक्षकावर टीका करणाऱ्यांना चांगले उत्तर आहे. यातील अनेक बाबी अजेंडा प्रभावित आहे. कुणी असे का व कशासाठी करीत आहे, याची मला कल्पना नाही, पण अशा प्रकारचा खोटारडेपणा अजेंडाने प्रभावित आहे. सुदैवाने रवी शास्त्री मात्र अशा बाबींची पर्वा करीत नाही, ही चांगली बाब आहे.
डावखुरा फिरकीपटू म्हणून संघात पदार्पण करणाºया रवी शास्त्री यांनी त्यानंतर भारतातर्फे डावाची सुरुवात केली आणि १९८५ मध्ये विश्व सीरिज क्रिकेटमध्ये ते ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरीही ठरले. मुख्य प्रशिक्षकाचे समर्थन करताना कोहलीने या सर्व बाबींचा खुलासा केला.
कोहलीने शास्त्री यांना ट्रोल करणाºयांना संदेश देताना म्हटले की, ‘१० व्या क्रमांकापासून सुरुवात करताना सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांनी छाप सोडली. सलामीवीर म्हणून त्यांनी ४१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. घरी बसून ट्रोल करणाºया व्यक्तीमुळे ते निराश होणार नाहीत. त्यांच्यासारख्या व्यक्तीला ट्रोल करायचे असेल तर त्यांच्याप्रमाणे गोलंदाजांना सामोरे जायला हवे. असे करण्यासाठी धैर्य आवश्यक असते. त्यानंतर वाद-विवाद करायला हवा.’
अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर कोहलीने आपल्या वेगवान गोलंदाजी आक्रमणास ‘स्वप्नील संयोजन’ असल्याचे म्हटले होते. हे गोलंदाज कुठल्याही खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम असल्याचे त्याने सांगितले. भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत केली, हे विशेष.

Web Title: Coach Ravi Shastri is being trolled deliberately - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.