प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी शैली बदला, समीक्षेनंतर जस्टिन लँगर यांना मिळाले संकेत

Justin Langer: ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसम संपल्यानंतर लँगर यांच्या कामाची समीक्षा करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांना ही सूचना देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:05 AM2021-05-28T09:05:56+5:302021-05-28T09:06:50+5:30

whatsapp join usJoin us
Change the style to stay as coach, hints Justin Langer got after the review | प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी शैली बदला, समीक्षेनंतर जस्टिन लँगर यांना मिळाले संकेत

प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी शैली बदला, समीक्षेनंतर जस्टिन लँगर यांना मिळाले संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्यासाठी जस्टिन लँगर यांना आपली कार्यशैली बदलावी लागेल. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसम संपल्यानंतर लँगर यांच्या कामाची समीक्षा करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांना ही सूचना देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४० खेळाडू आणि सहयोगी स्टाफकडून घेतलेल्या प्रतिक्रियांनुसार प्रशिक्षक लँगर यांना ही सूचना देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असे नमविले. यानंतर काही खेळाडूंनी लँगर यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली होती.
२०१८ साली झालेल्या चेंडूच्या छेडछाड प्रकरणानंतर डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडले होते आणि यानंतर लेहमन यांचे एकेकाळचे संघसहकारी असलेले लँगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या  प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख बेन ऑलिव्हर यांनी सांगितले की, ‘गेल्यावेळचा विश्वचषक आणि २०१९ च्या अ‍ॅशेस मालिकेनंतर झालेल्या प्रक्रियेप्रमाणेच हीदेखील एक प्रक्रिया करण्यात येत आहे. त्या वेळीही आमच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. मैदानावरील व बाहेरील कामगिरीत सुधारणा करण्याबाबत आमची ही एक कार्यपद्धत आहे. यामुळे आगामी भारतात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि मायदेशात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी आम्हाला फायदा होईल, अशी आशा आहे.’

Web Title: Change the style to stay as coach, hints Justin Langer got after the review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.