'कॅप्टन कूल' धोनी WWE च्या रिंगमध्ये उतरणार, Royal Rumble सामन्यासाठी आयोजकांची विचारणा

WWE रॉयल रम्बल हा WWE मधील वर्षातील सर्वात मोठा दुसरा इव्हेंट... पुढील रविवारी होणाऱ्या या लढतीत मोठमोठे सुपरस्टार जेतेपदासाठी भिडतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:29 PM2019-01-25T14:29:09+5:302019-01-25T14:33:15+5:30

whatsapp join usJoin us
'Captain Cool' MS Dhoni to be in the Royal Rumble 2019 ring?, WWE asks fans | 'कॅप्टन कूल' धोनी WWE च्या रिंगमध्ये उतरणार, Royal Rumble सामन्यासाठी आयोजकांची विचारणा

'कॅप्टन कूल' धोनी WWE च्या रिंगमध्ये उतरणार, Royal Rumble सामन्यासाठी आयोजकांची विचारणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : WWE रॉयल रम्बल हा WWE मधील वर्षातील सर्वात मोठा दुसरा इव्हेंट... पुढील रविवारी होणाऱ्या या लढतीत मोठमोठे सुपरस्टार जेतेपदासाठी भिडतील. विशेष म्हणजे पुरुषांप्रमाणे महिलांतही या प्रतिष्ठेच्या किताबासाठी चुरस रंगणार आहे. गेली अनेक वर्ष हा इव्हेंट WWE च्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र यंदाचा Royal Rumble सामना थोडा वेगळा आणि भारतीयांसाठी खास असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ' कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी Royal Rumbleच्या रिंगमध्ये  दिसण्याची शक्यता आहे. 

WWE ने भारतीय चाहत्यांकडून एक पोल मागवला आहे. त्यात त्यांनी धोनीला Royal Rumble सामन्यात पाहायला तुम्हाला आवडेल का, असा सवाल केला आहे. चाहत्यांनीही या पोलला प्रतिसाद देताना WWE आयोजकांना होकार कळवला आहे. 



याआधी WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा मॅनेजर पॉल हेयमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅप्टन कूल धोनीचे कौतुक करणारे ते ट्विटर होते. त्यावर हेयमॅनने प्रतिक्रिया नोंदवली. त्याची दखल घेत आयसीसीने हेयमॅन आणि लेसनर यांना चक्क वर्ल्ड कप तिकीट ऑफर केले होते. 


त्यावर हेयमॅन म्हणाला," WWE युनिव्हर्सल चॅम्पियनला वर्ल्ड कप स्पर्धेचा जागतिक स्तरावर प्रचार वाढवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. तेथे येण्यासाठी तुम्ही आम्हाला आठ अंकी रक्कम द्याल अशी अपेक्षा."


दरम्यान धोनी या Royal Rumble सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. धोनी सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यातील पाचवा वन डे सामना 3 जानेवारीला होणार आहे.

Web Title: 'Captain Cool' MS Dhoni to be in the Royal Rumble 2019 ring?, WWE asks fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.