Broom Broom माही... कॅप्टन कूल धोनीचा बाईक चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:44 AM2019-09-24T11:44:11+5:302019-09-24T11:44:54+5:30

whatsapp join usJoin us
Broom Broom Mahi ... video of Captain Cool MS Dhoni riding a bike viral | Broom Broom माही... कॅप्टन कूल धोनीचा बाईक चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Broom Broom माही... कॅप्टन कूल धोनीचा बाईक चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. त्यानं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला नव्हता. त्या कालावधीत त्यानं भारतीय सैन्यात काम केले. 15 दिवस त्यानं जम्मू काश्मीर येथील खोऱ्यात जवानांसोबत पहारा दिला. त्यानंतरच्या मायदेशात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका मालिकेतूनही धोनीनं माघार घेतली. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. 

सैन्यसेवेनंतर धोनी नुकताच रांचीत परतला. क्रिकेटमधून विश्रांती घेतली असली तरी धोनी नियमित सराव करत आहे. दोन महिन्यांनंतर धोनी घरी गेल्यावर त्याचे कुटुंबीय तर वाट पाहत होतेच. पण एक खास गाडी त्याची वाट पाहत होती. धोनीने काही दिवसांपूर्वी एक गाडी बूक केली होती. धोनीच बाईक्स आणि कारवरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही नवीन जीप धोनीच्या घरी दाखल झाली, त्यावेळी साक्षीला माहीची आठवण आली.  धोनीच्या ताफ्यात दाखल झालेल्या या जीपची किंमत ही जवळपास 79 लाख इतकी आहे. त्यामुळे आज घरी गेल्यावर माहिने या गाडीतून सैर केल्याचे पाहायला मिळाले.

पण, मंगळवारी धोनी निंजा बाईक्सवर सराव झालेला पाहायला मिळाला. 

माहीने घेतली ही ढासू बाईक; BMW च्या इंजिनामुळे रेसिंग बनणार रोमांचकारी

पाहा व्हिडीओ...

खूशखबर : महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली
आता धोनी नोव्हेंबरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  धोनीनं क्रिकेटपासूर आणखी काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला असून तो विजय हजारे चषक आणि बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेलाही मुकणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातील मालिकेतून धोनी पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्ला
भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनीला आता बस कर... असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले,'' महेंद्रसिंग धोनीच्या मनात नेमकं काय आहे, हे कुणालाही माहित नाही. भारतीय संघातील त्याच्या भविष्याबद्दल तोच सांगू शकतो, परंतु मला वाटतं तो आता 38 वर्षांचा आहे आणि टीम इंडियानं पुढील विचार करायला हवा. कारण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंत धोनी 39 वर्षांचा होईल.'' 
''धोनीचं संघासाठीच्या योगदानाचा मुल्यमापन कुणीच करू शकत नाही. केवळ धावाच नव्हे, तर यष्टिंमागूनही त्यानं संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. संघात त्याचं असणे हे केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर कर्णधाराच्याही फायद्याचे असते. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणाचा संघालाच फायदा मिळतो. पण, आता ती वेळ आली आहे,'' असे गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले. 
 

Web Title: Broom Broom Mahi ... video of Captain Cool MS Dhoni riding a bike viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.