Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू 

Shardul Thakur : राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:11 PM2021-10-13T17:11:46+5:302021-10-13T17:12:43+5:30

whatsapp join usJoin us
Breaking news : Shardul Thakur replaces Axar Patel in Team India's World Cup squad | Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू 

Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shardul Thakur replaces : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अंतिम १५ जणांच्या ताफ्यात बदल होणार, अशी चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती. हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) ची आयपीएल २०२१मधील निराशाजनक कामगिरी आणि त्याची तंदुरुस्ती हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे त्याच्या नावावर फुल्ली मारली जाईल असा अंदाज होता.  बीसीसीआयनं बुधवारी अखेर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात बदल झाल्याचे जाहीर केले. राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. पण, त्याच्यासाठी हार्दिक नव्हे, तर दुसऱ्याच खेळाडूला डच्चू दिला गेला आहे.

बीसीसीआयनं बुधवारी शार्दूलच्या समावेशाची माहिती देताना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवल्याची घोषणा केली. Shardul Thakur replaces Axar Patel in Team India’s World Cup squad. टीम इंडियाच्या निवड समितीनं संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल हा टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात होता, परंतु तो आता राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे. शार्दूलच्या समावेशामुळे वर्ल्ड कप संघात हार्दिक आता फक्त फलंदाज म्हणून असणार आहे. 
 

भारतीय संघ - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी ( India’s squad for ICC T20 World Cup: Virat Kohli (captain), Rohit Sharma (vice-captain), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Ishan Kishan, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Shardul Thakur, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohammad Shami)

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल ( Stand-by players: Shreyas Iyer, Deepak Chahar, Axar Patel)

भारतीय संघाला सरावात मदत करणारे खेळाडू -  आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम. 

भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
उपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर 
अंतिम सामना - १४ नोव्हेंबर

Web Title: Breaking news : Shardul Thakur replaces Axar Patel in Team India's World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.