Big Update : IPL 2020 बाबतचा अंतिम निर्णय 'या' तारखेला होणार; BCCI कॉन्फरन्स कॉल करणार

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:52 PM2020-03-21T15:52:52+5:302020-03-21T16:02:30+5:30

whatsapp join usJoin us
BCCI, Franchises To Decide IPL 2020's Fate On Tuesday Via Conference Call svg  | Big Update : IPL 2020 बाबतचा अंतिम निर्णय 'या' तारखेला होणार; BCCI कॉन्फरन्स कॉल करणार

Big Update : IPL 2020 बाबतचा अंतिम निर्णय 'या' तारखेला होणार; BCCI कॉन्फरन्स कॉल करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, सीरि ए इटालियन, चॅम्पियन्स लीग, युरो लीग आदी फुटबॉल स्पर्धांसह भारत-दक्षिण आफ्रिका, श्रीलंका- इंग्लंड, पाकिस्तान-बांगलादेश आदी क्रिकेट मालिका रद्द करण्यात आल्या. इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल 2020) 13 वे मोसम होईल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला. पण, आता आयपीएल संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत.

आयपीएल संदर्भात फ्रँचायझी मालकांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक बोलवली होती.  या बैठकीत ६-७ पर्यायांवर चर्चा केली गेली. आयपीएल स्पर्धा उशीरानं सुरु झाली, तर लीगचे स्वरूप कसे असेल, आठ संघांची दोन गटांत विभागणी करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे लीग खेळवता येईल का, डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवली जाऊ शकते का की दिवसाला तीन सामने खेळवण्यात यावे, आदी अनेक मुद्यांवर चर्चा केली गेली होती. 

याचवेळी परिस्थिती सुधारल्यास आयपीएल कोणत्या तारखेपासून सुरू करायची यावरही चर्चा झाली. त्यानुसार १५ एप्रिल, २१ एप्रिल, २५ एप्रिल, १ मे आणि ५ मे अशा तारखांचा पर्याय ठेवण्यात आळा. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यास या पाचपैकी एका तारखेपासून आयपीएल सुरू होईल. बीसीसीआयनं हे आधीच स्पष्ट केलं आहे की ही स्पर्धा २५ एप्रिलपर्यंत सुरू केली जाईल. तसे न झाल्यास पुढे सर्व सामने खेळवण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पण, देशातील सद्यस्थिती पाहता आयपीएल संदर्भात बीसीसीआयनं फ्रँचायझी मालकांसोबत 24 मार्चला तातडीची बैठक बोलावली आहे. बीसीसीआय आणि फ्रँयचायझी मालकांमध्ये कॉन्फरन्स कॉल होणार आहे आणि त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार

'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...

OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह

Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही

Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव

Corona मुळे क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा; इंग्लंडच्या खेळाडूला वाटतेय भीती

पंतप्रधान मोदींच्या 'जनता कर्फ्यू'वर टेनिस स्टार सानिया मिर्झा म्हणते...

Web Title: BCCI, Franchises To Decide IPL 2020's Fate On Tuesday Via Conference Call svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.