Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांचे आभार मानणारे ट्विट केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:20 PM2021-03-24T15:20:04+5:302021-03-24T15:20:24+5:30

whatsapp join usJoin us
Axar Patel responds with special message after Anand Mahindra poses for selfie in 'Axar' shades | Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांचे आभार मानणारे ट्विट केलं. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अक्षर पटेलनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत घातलेला गॉगलसारखाच गॉगल घालून सेल्फी पोस्ट केला. भारत-इंग्लंड यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अक्षर पटेलनं टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं आणि त्यानं तीन कसोटीत २७ विकेट्स घेत अनेक विक्रम मोडले. त्या मालिकेत अक्षर पटेलनं घातलेला गॉगल आनंद महिंद्रा यांना फार आवडला होता. भारतानं ट्वेंटी-२० मालिका ३-२ अशी जिंकल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तसाच गॉगल घालून सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली. वडिलांची हॅट, शूज अन् कपडे घेऊन हार्दिक-कृणाल पांड्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले, Photo Viral

भारतानं कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवल्यानंतर महिंद्रा यांनी फक्त गॉगलचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर नेटिझन्सनी महिंद्रा यांना गॉगल घालून फोटो पोस्ट करण्याचा आग्रह धरला.  तेव्हा महिंद्रा यांनी ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यावर सेल्फी पोस्ट करतो, असे वचन दिले आणि त्यानंतर त्यांनी ते पूर्णही केलं.  


त्यांच्या या पोस्टवर अक्षर पटेलनं लिहिलं की,''सर हे गॉगल घातल्यानंतर तुम्ही आणखी कूल दिसताय. तुम्ही दिलेल्या पाठींब्याबद्दल आभार.''

 

Web Title: Axar Patel responds with special message after Anand Mahindra poses for selfie in 'Axar' shades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.