डेव्हीड वॉर्नरचा बर्थ डे ब्लास्ट; ट्वेंटी-20 झळकावले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

चेंडु कुरतडण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघात परतलेल्या डेव्हीड वॉर्नरने अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:10 PM2019-10-27T12:10:47+5:302019-10-27T12:12:02+5:30

whatsapp join usJoin us
Aus vs SL, T20I : David Warner slams maiden T20I ton, Kasun Rajitha records most expensive figures | डेव्हीड वॉर्नरचा बर्थ डे ब्लास्ट; ट्वेंटी-20 झळकावले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

डेव्हीड वॉर्नरचा बर्थ डे ब्लास्ट; ट्वेंटी-20 झळकावले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेंडु कुरतडण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघात परतलेल्या डेव्हीड वॉर्नरने अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात वॉर्नरने तुफान फटकेबाजी केली. त्याला कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांचीही तोडीसतोड साथ मिळाली. वॉर्नरचे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक ठरले. या सामन्यात स्टीव्ह स्मिथनेही ऑसींच्या ट्वेंटी-20 संघात पुनरागमन केले, परंतु त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. वॉर्नरचा आज 33वा वाढदिवस आहे आणि आजच्याच दिवशी त्यानं खणखणीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला 2 बाद 233 धावांची मजल मारून दिली.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते, ते वॉर्नर आणि स्मिथ यांच्याकडे. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर हे दोघे प्रथमच ऑसींच्या मर्यादित षटकांच्या संघात कमबॅक करणार होते. वॉर्नरला अॅशेस मालिकेत अपयश आले असले तरी त्यानं ट्वेंटी-20त दमदार कमबॅक केला. त्यानं 56 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. 

वॉर्नरच्या फटकेबाजीसह या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे अतरंगी शॉट्सही पाहायला मिळाले. मॅक्सवेलनं 28 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीनं 221.42च्या स्ट्राईक रेटनं 62 धावा कुटल्या. तत्पूर्वी, फिंचने 36 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 64 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी फिंच, मॅक्सवेल आणि शेन वॉटसन यांनी हा पराक्रम केला आहे.  श्रीलंकेच्या कसून रंजितानं 4 षटकांत 75 धावा देत सर्वात महागड्या गोलंदाजाचा मान पटकावला.   

Web Title: Aus vs SL, T20I : David Warner slams maiden T20I ton, Kasun Rajitha records most expensive figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.