मुकाबला रंगणार, भारत-पाकिस्तान भिडणार; कधी, कुठे, केव्हा? जाणून घ्या

दुबईमध्ये रंगणार आशिया चषक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:24 AM2020-02-29T02:24:34+5:302020-02-29T06:35:07+5:30

whatsapp join usJoin us
asia cup in dubai both india and pakistan will play says saurav ganguly kkg | मुकाबला रंगणार, भारत-पाकिस्तान भिडणार; कधी, कुठे, केव्हा? जाणून घ्या

मुकाबला रंगणार, भारत-पाकिस्तान भिडणार; कधी, कुठे, केव्हा? जाणून घ्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : आगामी आशिया चषक स्पर्धा दुबई येथे होणार असून या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा सहभाग निश्चित असेल,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. यामुळे आशिया चषक स्पर्धेची उत्सुका उंचावली असून आता क्रिकेटविश्वाला वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान या ‘हायव्होल्टेज’ सामन्याकडे.

स्पर्धेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा याआधी सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानमध्ये रंगणार होती. मात्र याआधीच बीसीसीआयने पाकमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर संकट आले होते. यानंतर ही स्पर्धा दुबई येथे खेळविण्याचा निर्णय झाल्याने आता क्रिकेटविश्वाचे आशियाई लढतींकडे लागले आहे.

दुबई येथे ३ मार्चला आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) बैठक होणार असून या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी गांगुली यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, ‘आशिया चषक स्पर्धा दुबईमध्ये होणार असून या स्पर्धेत भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश खेळतील.’

याआधी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेला भारताने कोणतीही अडचण नसल्याचे सांगितल होते, मात्र
भारताचे सामने अन्यत्र ठिकाणी खेळविण्यात यावे अशी मागणी केली होती. २०१२-१३ सालानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कोणतीही क्रिकेट मालिका खेळविण्यात आलेली नाही. राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी २०१३ सालानंतर केवळ आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. (वृत्तसंस्था)

भारतीय महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त खेळत असून त्यांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली. स्पर्धा अत्यंत चुरशीची असून विश्वविजेतेपदासाठी कोणीही संभाव्य विजेता ठरविता येत नाही.
- सौरव गांगुली

Web Title: asia cup in dubai both india and pakistan will play says saurav ganguly kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.