Ashes Series: Australia-England second Test starting from Wednesday | अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी बुधवारपासून
अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी बुधवारपासून

लंडन : इंग्लंड वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या उपस्थितीत आपल्या गोलंदाजी आक्रमणामध्ये बदल करीत मैदानात उतरणार असून बुधवारपासून येथे लॉर्ड््सवर प्रारंभ होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला लवकर बाद करीत अ‍ॅशेस मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळण्याची यजमानांना आशा आहे.
इंग्लंडमध्ये १८ वर्षांनंतर अ‍ॅशेस मालिका जिंकण्यास प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाने स्मिथच्या शानदार खेळींच्या जोरावर एजबस्टनमध्ये पहिल्या कसोटीत १५१ धावांनी विजय मिळवला. चेंडू छेडखानी प्रकरणामुळे १२ महिन्याच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन करणाºया स्मिथने दोन्ही डावात शतक ठोकले.
इंग्लंडने पहिली कसोटी गमावल्यानंतर केवळ दोनदा अ‍ॅशेस मालिका जिंकली आहे. सर्वप्रथम १९८१ मध्ये इयान बोथमने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता तर दुसऱ्यांदा २००५ मध्ये इंग्लंडने रोमांचक विजय साकारला होता. पराभवादरम्यान इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसन पोटरीच्या दुखापतीमुळे केवळ चार षटके गोलंदाजी करू शकला. तो लॉर्ड््समध्ये खेळल्या जाणाºया दुसºया कसोटी सामन्यातून ‘आऊट’ झाला आहे. अँडरसनच्या अनुपस्थितीत इंग्लंडने आर्चरला कसोटी पदार्पणाची संधी देण्याची तयारी केली आहे. आर्चरने याच मैदानात गेल्या महिन्यात विश्वकप फायनलमध्ये शानदार सुपर ओव्हर टाकताना इंग्लंडला जेतेपद पटकावून दिले होते. इंग्लंड या लढतीत डावखुरा फिरकीपटू जॅक लीचला संधी देणार आहे. त्याने गेल्या महिन्यात लॉर्ड््सवर आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी विजयादरम्यान कारकिर्दीतील सर्वोत्तम ९२ धावांची खेळी केली होती. एजबस्टनमधील निराशाजनक कामगिरीनंतर ऑफ स्पिनर मोईन अलीला संघातून वगळण्यात आले आहे. डावखुरा फिरकीपटू स्मिथची कमकुवत बाजू आहे. त्यांच्याविरुद्ध त्याची सरासरी ३४.९० अशी आहे. त्याची एकूण सरासरी जवळजवळ ६३ अशी आहे. जस्टिन लँगर यांनी मात्र अशा कुठल्या आकडेवारीला महत्त्व देण्याचे फेटाळले.

स्टार्क, हेजलवूडला संधी, पॅटिन्सनला वगळले

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध दुसºया अ‍ॅशेस कसोटीसाठी वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला १२ सदस्यांच्या संघात स्थान दिलेले नाही. मिशेल स्टार्क व जोश हेजलवूड हे दोघेही संघात असून त्यांचे पुनरागमन शक्य आहे. पॅटिन्सन एजबस्टनमध्ये २५१ धावांच्या विजयात संघात होता. तो तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिला कसोटी सामना खेळत होता. त्याने दोन बळी घेतले.

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ :- टीम पेन (कर्णधार व यष्टिरक्षक), डेव्हिड वॉर्नर, कॅमरन बेनक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियोन, जोश हेजलवुड.

वादानंतरही एमसीसीने तटस्थ पंचांचे केले समर्थन
लंडन : क्रिकेटचे नियम तयार करणारी संस्था मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) पहिल्या अ‍ॅशेस कसोटीमध्ये अनेक चुकीच्या निर्णयानंतरही कसोटी सामन्यात तटस्थ पंचांचे समर्थन केले आहे. गेल्या आठवड्यात एजबस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचे पंच जोएल विल्सन व पाकिस्तानचे अलीम दार यांचे एकूण १० निर्णय खेळाडू डीआरएसच्या मदतीने बदलण्यात यशस्वी ठरले होते.
या व्यतिरिक्त किमान आणखी पाच निर्णय चुकीचे होते. त्याचे समीक्षण करण्यात आले नव्हते.

Web Title: Ashes Series: Australia-England second Test starting from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.