Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:12 PM2019-08-19T19:12:18+5:302019-08-19T19:12:50+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2019: England announce team for third Test, see who gets a chance | Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या अ‍ॅशेस सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे. त्यामुळे त्यांनी जर हा सामना जिंकला तर त्यांना मालिकेत बरोबरी करता येऊ शकते.

या सामन्यात इंग्लंडने अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संधी दिलेली नाही. पण सध्या भन्नाट फॉर्मात आणि चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मात्र या सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे.

इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि सॅम कुरन.


स्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णय
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथला बॉल लागला होता. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. पण आता स्मिथला जबर दुखापत झाल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे, असे समजते आहे.

अॅशेस मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात स्मिथला लागला की, त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आलाच नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आता एक निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या सुरक्षेसाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानेपर्यंत असलेले हेल्मेट वापरण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नवीन हेल्मेटसह खेळताना दिसतील. त्यामुळे आता हे हेल्मेट कसे असेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Web Title: Ashes 2019: England announce team for third Test, see who gets a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.