आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; पहिल्या पत्नीकडून आहेत पाच मुलं!

फेब्रुवारी 2015मध्ये मोहम्मद नबीकडून कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली 56 वन डे सामन्यांत संघानं 36 विजय मिळवले, तर 20 सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 13, 2020 10:35 AM2020-11-13T10:35:05+5:302020-11-13T10:35:30+5:30

whatsapp join usJoin us
Asghar Afghan gets engaged for the second time, he already has five children from his first wife | आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; पहिल्या पत्नीकडून आहेत पाच मुलं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; पहिल्या पत्नीकडून आहेत पाच मुलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार असगर अफगान ( Asghar Afghan) हा आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. काबुलच्या या मधल्याफळीतील फलंदाजानं दुसऱ्यांदा साखरपुडा केला. हे त्याचं दुसरं लग्न असणार आहे. त्याला पहिल्या पत्नीकडून पाच मुलं आहेत. असगर हा अफगाणिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

असगरनं 2009मध्ये अफगाणिस्थान संघांकडून ( वि. स्कॉटलंड) पदार्पण केले. त्यानं 111 वन डे सामन्यांत 24.54 च्या सरासरीनं 2356 धावा केल्या. तर 69 ट्वेंटी-20 सामन्यांत 1248 धावा केल्या, तर 4 कसोटीत त्याच्या नावावर 249 धावा आहेत. अफगाणिस्तानचा वरिष्ठ पत्रकार इब्राहिम यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की,''अफगाणिस्ताचा राष्ट्रीय संघाचा कर्णधार असगर अफगान दुसऱ्यांदा साखरपुडा करत आहे. त्याला पहिल्या पत्नीकडून पाच मुलं आहेत. कर्णधाराच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा...'' 


असगरनं फेब्रुवारी 2015मध्ये मोहम्मद नबीकडून कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली 56 वन डे सामन्यांत संघानं 36 विजय मिळवले, तर 20 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. आशिया चषक 2018मध्ये अफगानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं भारतासोबतचा सामना बरोबरीत रोखला होता. 

पण, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं वन डे वर्ल्ड कप ( 2019)च्या तोंडावर गुलबदीन नायबकडे संघाचे कर्णधारपद सोपवलं. पण, त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. गुलबदीनच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला 12 पैकी 2 सामने जिंकता आले.  त्यानंतर राशिद खानकडे तीनही फॉरमॅटच्या संघाचे नेतृत्व सोपवले, परंतु डिसेंबर 2019मध्ये अफगानला पुन्हा कर्णधार बनवले गेले.

Web Title: Asghar Afghan gets engaged for the second time, he already has five children from his first wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.