विराट कोहलीच्या द्विशतकावर अनुष्काने दिली खास रीअ‍ॅक्शन

या द्विशतकानंतर विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर खास रीअ‍ॅक्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 01:33 PM2019-10-12T13:33:13+5:302019-10-12T13:34:10+5:30

whatsapp join usJoin us
Anushka Sharma's special reaction on Virat Kohli's double century | विराट कोहलीच्या द्विशतकावर अनुष्काने दिली खास रीअ‍ॅक्शन

विराट कोहलीच्या द्विशतकावर अनुष्काने दिली खास रीअ‍ॅक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी द्विशतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे सातवे द्विशतक ठरले. या द्विशतकानंतर विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर खास रीअ‍ॅक्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या एका द्विशतकाच्या जोरावर कोहलीने माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. विराट कोहलीने या सामन्यात सात हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावांसह कोहलीने सातवे द्विशतकही झळकावले आहे. भारताकडून सर्वाधिक द्विशतके सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होती. या दोघांनी सहा द्विशतके झळकावली होती. पण कोहलीने या सामन्यात सातवे द्विशतक झळकावले आणि या दोघांनाही पिछाडीवर सोडले.

कोहलीच्या द्विशतकानंतर अनुष्काने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे. द्विशतक झळकावल्यानंतर कोहलीने जे सेलिब्रेशन केले तो फोटो अनुष्काने शेअर केला आणि त्यावर लाल रंगाचे हार्ट्सचे इमोजी पोस्ट केले आहेत.

विराट कोहलीने या वर्षात पहिल्यांदा 'ही' गोष्ट केली
सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. कोहली हा धावांचा डोंगर नेहमीत उभारतो. पण या वर्षात मात्र कोहलीला जास्त धावा करता आलेल्या नाही. या सामन्यापूर्वी कोहलीने बरेच विक्रम केले, पण एक गोष्ट मात्र त्याला करता आली नव्हती.

यंदाच्या वर्षात भारताने जवळपास सर्वच सामने जिंकले आहेत. पण कोहलीला मात्र या वर्षात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहली हा सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल, असे बऱ्याच जणांना वाटते. पण कोहलीला या वर्षात एकही कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते.

या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळला. या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. या चार सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या 76 आहे. त्यामुळे या वर्षातील त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले आहे.

Web Title: Anushka Sharma's special reaction on Virat Kohli's double century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.