Anushka Sharma's dismissed and criticized cricketer said sorry | अनुष्का शर्माची सटकली आणि टीकाकार क्रिकेटपटूची पायाखालची जमिन सरकली
अनुष्का शर्माची सटकली आणि टीकाकार क्रिकेटपटूची पायाखालची जमिन सरकली

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बऱ्याच स्पर्धांना उपस्थिती लावते. अनुष्का इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक पाहायलाही गेली होती. यावेळी अनुष्काचा पाहुणचार निवड समितीचे सदस्य करत होते. अनुष्काला चहा देणे, तिचे चहाचे कप उचलणे, असे प्रकार निवड समितीमधील सदस्य करत होते, असा खळबळजनक खुलासा भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला होता. यावर अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली होती. पण आता अनुष्काची सटकल्यावर मात्र इंजिनिअर यांनी चक्क अनुष्काची माफी मागितली आहे.

आतापर्यंत अनुष्का बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. विराटबरोबर फिरताना अनुष्काला बऱ्याचदा ट्रोल केले गेले आहे. त्याचबरोबर अनुष्का ही विराटसाठी अनलकी असल्याचेही म्हटले गेले आहे. पण आतापर्यंत या सर्व विषयांवर अनुष्का काहीच बोलली नव्हती. पण आता नेमकं असं काय घडलंय की, अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली होती.

अनुष्काने याबाबत एक ट्विट केले होते. यामध्ये अनुष्काने लिहिले आहे की, " या आरोपांमध्ये काहीही सत्य नाही. मी इंग्लंडमध्ये सामना पाहायला गेले होते. पण तेव्हा माझ्याबरोबर एकही निवड समितीचे सदस्य नव्हते. मी कुटुंबियांच्या स्टँडमध्ये बसली होती. त्यामुळे या आरोपांचा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला निवड समितीवर टीका करायची असेल तरमला त्यामध्ये का ओढत आहात."

आता इंजिनिअर यांनी अनुष्कापुढे नमते घेतले आहे. ते म्हणाले की, " हो. ही गोष्ट घडली होती. पण मी निवड समितीची मस्करी करताना ही टिप्पणी केली होती. पण या प्रकरणात आता अनुष्काला विनाकारण ओढले जात आहे. अनुष्का एक चांगली व्यक्ती आहे आणि विराट हा आदर्शवत खेळाडू आहे. जर माझे वक्तव्य अनुष्काला आवडले नसेल तर मी माफी मागतो. मी निवड समितीबाबत म्हटले होते, कारण ते त्यांचे काम योग्यपणे करताना दिसत नाहीत."

Web Title: Anushka Sharma's dismissed and criticized cricketer said sorry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.