Amid of retirement rumors, Srinivasan comments on MS Dhoni's future with CSK | महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत एन श्रीनिवासन यांची मोठी भविष्यवाणी

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत एन श्रीनिवासन यांची मोठी भविष्यवाणी

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दोन मालिकांमधून माघार काय घेतली, तर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण येऊ लागले आहे. त्या कर्णधार विराट कोहलीनं कॅप्टन कूलसोबतचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिल्यानंतर तर या चर्चांना वेग आला. पण, धोनीची पत्नी साक्षीनं ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही दिग्गज यष्टिरक्षक धोनीनं याबबात अद्याप काही कळवले नसल्याचे सांगून या चर्चांचा फुगा फोडला.

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं निवृत्त व्हावं, अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. कोहलीनं इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.  या सगळ्या अफवा असल्याचे मत साक्षीने ट्विटरवर व्यक्त केले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या बातमीला पूर्णविराम लागला. 


भारत आणि दक्षिण आफ्रिके यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 मालिकेपूर्वीच्या पत्रकार परिषदेतही कोहलीनं त्या फोटोमागचा हेतू सांगितला. तो म्हणाला,''माझ्या मनात दूरदूर पर्यंत असा विचार नव्हता की धोनी निवृत्ती घेतोय. बस मला त्या सामन्याची आठवण झाली. त्यामुळे मी सहज तो फोटो शेअर केला. पण, लोकांनी त्याचा भलताच अर्थ लावला गेला.''  

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास यांनी सांगितले की,''धोनी निवृत्त कधी होईल, हे मी सांगू शकत नाही. पण, तो आयपीएलच्या पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार, हे नक्की.'' 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amid of retirement rumors, Srinivasan comments on MS Dhoni's future with CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.