इंग्लंड बोर्डवर वर्णद्वेषाचा आरोप

माजी अम्पायर व माजी खेळाडूने केली चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:53 AM2020-11-18T05:53:03+5:302020-11-18T05:55:02+5:30

whatsapp join usJoin us
Allegations of racism against the England board | इंग्लंड बोर्डवर वर्णद्वेषाचा आरोप

इंग्लंड बोर्डवर वर्णद्वेषाचा आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : माजी कसोटी पंच जॉन होल्डरने इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डवर(ईसीबी) वर्षानुवर्षे ‌वर्णद्वेषाचा आरोप होत आहे.  देशातील अल्पसंख्यक समुदायाने सामनाधिकाऱ्यांची संख्या का कमी आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


हॅम्पशायरचे माजी क्रिकेटपटू होल्डर यांनी तीन दशकाच्या कारकिर्दीत ११ कसोटी व १९ वन-डेमध्ये अम्पायरिंग केली आहे. अश्वेत अम्पायर्सला १९९२ नंतर प्रथम श्रेणी यादीमध्ये स्थान दिलेले नाही, असेही ते म्हणाले. होल्डर म्हणाले, ‘मी इंग्लंडमध्ये ५६ वर्षांपासून राहत आहो. मी यापूर्वी कधीच वर्णद्वेषाचा अनुभव घेतलेला नाही, असे मी शपथेवर सांगू शकतो. पण तुम्ही जर आकडेवारीवर नजर टाकली तर काय घडत आहे, याची कल्पना येईल. त्यावरून निष्कर्ष काढणे कठीण आहे.’


ते पुढे म्हणाले, ‘ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) काम करणे बंद केले त्यावेळी मी ईसीबीसोबत संपर्क साधला. मी अम्पायर्सला मेन्टोरिंग करण्यास इच्छुक आहे, पण मला कुठलेही उत्तर मिळाले नाही.’


होल्डर यांनी पुढे सांगितले की, ‘त्याऐवजी माजी खेळाडूंना या भूमिकेसाठी नियुक्त करण्यात आले. त्यापैकी काही तर कधीच अम्पायरच्या भूमिकेत नव्हते. हे चकित करणारे आहे. हे म्हणजे ज्याला गाडी चालवता येत नाही त्याची गाडी चालविणे शिकविण्यासाठी नियुक्ती करण्यासारखे आहे.’
वॅनबर्न होल्डर ईसीबीच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अम्पायरिंग करणारे अखेरचे कृष्णवर्णीय अम्पायर होते. वेस्ट इंडिजतर्फे ४० कसोटी व १२ वन-डे खेळणारे वॅनबर्न होल्डर यांची १९९२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी अनेक अश्वेत उमेदवार या व्यवसायासोबत जुळण्यासाठी प्रयत्नशील होते, पण तसे घडले नाही.’
माजी अंडर-१९ क्रिकेटपटू इस्माईल दाऊद यांनीही ईसीबीवर संस्थानिक वर्णद्वेषाचा आरोप केला होता.

Web Title: Allegations of racism against the England board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.