Ajinkya Rahane spending quality time with daughter after 5 months, 2 countries, 8 cities  | ५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!

५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!

संकटांवर स्वार होऊन अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अॅडलेड कसोटीतील पराभवानंतर विराट कोहली ( Virat Kohli) पितृत्व रजेसाठी मायदेशी परतला. त्यानंतर एकामागून एक खेळाडू जायबंदी होत राहिले. या सर्व परिस्थितीत युवा शिलेदारांना सोबत घेऊन अजिंक्यनं टीम इंडियाचा तिरंगा डौलानं फडकावला. कोरोना व्हायरसच्या  संकटात क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League 2020)च्या १३व्या पर्वानं भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक कामगिरीनं भारतीयांची मनं जिंकली.

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत दणक्यात स्वागत झाले. ढोल ताशांचा गजरात, रेड कार्पेटवरून अजिंक्यचं स्वागत करण्यात आलं. इतक्या दिवसांनी मायदेशात परतलेल्या अजिंक्यनं सर्वप्रथम लेक आर्याला मिठी मारल्याचे सर्वांनी पाहिले. अजिंक्यनं शुक्रवारी लेकीला मांडीवर घेतलेला फोटो पोस्ट करून भावनिक मॅसेज लिहिला. '' ५ महिने, २ देश, ८ शहर इतका प्रवास केल्यानंतर आवडत्या शहरात लाडक्या व्यक्तिसोबत खास क्षण 


जिंकलंस अजिंक्य!; कांगारूचा लोगो असलेला केक कापण्यास दिला नकार
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यनं त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले. मेलबर्नवरील अविस्मरणीय शतक. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत चाललेली यादी पाहूनही तो डगमगला नाही, उलट नव्या दमाच्या सहकाऱ्यांना घेऊन कागांरूंशी भिडला. आर अश्विन व हनुमा विहारी यांची झुंज.. रवींद्र जडेजाची प्रभावी गोलंदाजी.. मोहम्मद सिराजचा अफलातून मारा, शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची दमदार खेळी, चेतेश्वर पुजारानं रोवलेला नांगर आणि रिषभ पंतची तुफान फटकेबाजी... या सर्वांनी मिळून हा दौरा अश्विस्मरणीय केला.

ढोल ताशा, तुतारी, फुलांची उधळण, रेड कार्पेट असं दणक्यात अजिंक्यचे स्वागत करण्यात आले. यावेळीसाठी एक खास केक तयार करण्यात आला होता. त्यावर कांगारूचा लोगो होता आणि अजिंक्यचा फोटोही होता. पण अजिंक्यनं तो केक कापण्यास नकार दिला. त्याच्या याही कृतीचं सर्वांनी कौतुक केलं.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajinkya Rahane spending quality time with daughter after 5 months, 2 countries, 8 cities 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.