मोहम्मद शमीनंतर आता भारताच्या 'या' गोलंदाजाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

शमीविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर आता भारताच्या एका माजी गोलंदाजाविरोधातही पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:41 PM2019-09-06T16:41:54+5:302019-09-06T16:43:41+5:30

whatsapp join usJoin us
After Mohammed Shami, munaf patel is now charged; complaint in police station | मोहम्मद शमीनंतर आता भारताच्या 'या' गोलंदाजाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

मोहम्मद शमीनंतर आता भारताच्या 'या' गोलंदाजाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरेंट काढण्यात आले आहे. पत्नी हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शमीचा पाय खोलात असल्याचे म्हटले जात आहे. शमीविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर आता भारताच्या एका माजी गोलंदाजाविरोधातही पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोहम्मद शमीविरुद्ध कोलकाता अलिपोर कोर्टाने अटर वॉरेंट काढले आहे. पण बीसीसीआय मात्र शमीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे. सध्याच्या घडीला शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण पोलिसांनी त्याला पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश अलिपोर कोर्टाने दिले आहेत. पण बीसीसीआयने यावेळी शमीच्या बाजू घेतली असून काही गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय शमीला अटक होऊ शकत नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. बीसीसीआयने शमीची बाजू घेतल्यावर आता या गोलंदाजाचीही बाजू घेणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पण हा गोलंदाज कोण आणि नेमके काय प्रकरण आहे, याची उत्सुकता तुम्हाला लागून राहीलेली आहे.

नेमके प्रकरण काय
बडोदा क्रिकेट संघटनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त देवेंद्र सुरती यांनी प्रसारमाध्यमांना कळवले होते. या भ्रष्टाचारामध्ये भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेलचे नाव होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आणि त्यानंतर मुनाफने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सुरती यांनी सांगितले. सुरती यांनी नवापुरा पोलीस ठाण्यामध्ये मुनाफविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी सुरती यांना पोलीस स्टेशनाला बोलावले असून मुनाफचीही चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.

शमीचे प्रकरण आहे तरी काय

जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.

शमीच्या अटक वॉरंटवर बीसीसीआयने म्हटले आहे की, " जोपर्यंत आम्ही आरोपपत्र पाहत नाही तोपर्यंत आम्ही शमीला अटक करू देणार नाही. आरोपपत्र पाहिल्यावर आम्ही योग्य निर्णय घेऊ."

Web Title: After Mohammed Shami, munaf patel is now charged; complaint in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.