तरुणाई होतेय ‘सोशल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:38 AM2018-05-15T02:38:40+5:302018-05-15T02:38:40+5:30

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे.

Young people are 'social' | तरुणाई होतेय ‘सोशल’

तरुणाई होतेय ‘सोशल’

Next

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे. आजची पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. त्यांना समाजातील उपेक्षितांबद्दल आस्था वाटू लागली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यात तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवसांतही एन्जॉयमेंट करणारी ही पिढी याच कालावधीचा उपयोग करून, आदिवासी पाड्यांत, गावाखेड्यांत श्रमदान करताना दिसून येतेय. ही पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. मुंबई शहर-उपनगरातील महाविद्यालयांच्या वतीने शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत सामाजिक कार्य शिकविले जाते. मात्र, आता ही पिढी त्या पलीकडे जाऊन ग्रुप तयार करत, कुटुंबाने एकत्र जात किंवा बºयाचदा एकट्यानेही गावा-खेड्यांत, आदिवासी पाड्यांत जाऊन त्या लोकसंस्कृतीत रमतेय. शहरातलं धकाधकीचं जीवन सोडून, घड्याळाच्या काट्यावरच जगणं विसरून ही पिढी या लोकवस्तीत रमून खºया अर्थाने आयुष्य काय असते, हे अनुभवतेय. सध्या महाविद्यालयांना सुट्ट्य पडल्या आहेत.
या दरम्यानही काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ग्रुप्स गावा-खेड्यांत काम करताना दिसतायत. ‘आरोह’ हा सामाजिक ग्रुप पालघर-डहाणूमधील लहानग्यांना मोफत संगीताचे धडे देतोय. या ग्रुपमधील विनय राजे सांगतो की, आम्ही दर वीकेंडला या गावात जातो. तेथील मुलांना घराघरांत जाऊन संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यांच्यासोबत जगण्याचा, राहण्याचा वेगळाच अनुभव घेऊन घरी येतो. गेली २ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुुरू आहे. ‘समाजस्नेही’ या मुलींच्या ग्रुपमधील पूजा शेवाळे सांगते की, आम्ही रस्त्यावरील मुलींना मासिक पाळीविषयी सांगतो. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी, त्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती देतो. शिवाय, विविध आदिवासी पाड्यांतही पथनाट्याच्या माध्यमातून या विषयाबद्दल जनजागृती करतो.
एकदंरित, अशा सामाजिक जगण्याने ही पिढी खºया अर्थाने समृद्ध होतेय. शहरातल्या मर्यादित ‘जगण्याची’ चौकट भेदून निसर्गाच्या शाळेत ही पिढी धडे गिरवतेय. गावा-खेड्यातील लोकसंस्कृती, विचार, राहणीमान, जीवनशैली यांच्याशी एकरुप होतेय. त्यामुळे अशा तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. जेणेकरुन, समाजाच्या समृद्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हे आदर्श पाऊल ठरेल.
>एप्रिल महिन्यात सोशल रिस्पॉसिबिलीटी सेलच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील पाथर्डी गावात श्रमदान करण्यासाठी गेले होते. या गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तिथे पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले, तसेच गावात सरकारची ‘मी लाभार्थी’ योजना गावकºयांना समजून सांगितली, तसेच योजनेचा अर्ज गावकºयांकडून भरून घेतला. गावातील अंगणवाडी रंगवून सुशोभित करण्याचे काम केले गेले. श्रमदानातून आपल्यावर श्रम संस्कार घडतात. उन्हाळी सुट्टीमध्ये आपण स्वत:मधील कला, गुण ओळखू शकतो, तसेच समाजातील समस्या, अडचणी कोणकोणत्या आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजे. यातून समाजात बदल घडवून आणू शकतो.
- मित्तल कांबळे, के. सी. महाविद्यालय
>एका संस्थेच्या पुढाकाराने येऊर येथे गेल्या आठवड्यात रस्त्यावर राहणाºया लहान मुलांना शिकवणी देण्यासाठी गेलो होतो. रस्त्यावर काम करणाºया मजुरांच्या मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत नाही. कारण त्यांना सतत जागा व ठिकाण बदलावे लागते. मग या मुलांना आठवड्यातील दर रविवारी गणित, इंग्रजी, चित्रकला, हस्तकला इत्यादी विषय शिकविले जायचे. मुलांना शिकविण्यात एक वेगळीच मज्जा मिळायची. मुलांच्या शिकवणीत बरेच अनुभव मिळाले. उन्हाळ्यात कित्येक लोक समर कॅम्प आयोजित करतात. या कॅम्पमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे आणि स्वत:ला सिद्ध करावे.
- मयूर पवार, साठ्ये महाविद्यालय.

Web Title: Young people are 'social'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.