वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

By admin | Published: June 11, 2016 10:56 PM2016-06-11T22:56:18+5:302016-06-11T22:56:18+5:30

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेतल्याशिवाय डंपर हलवू न देण्याचा पवित्रा गावकर्‍यांनी घेतल्याने पोलिसांची पंचाईत झाली होती.

Sand dump rickshaw and two-wheeler; Tension at the throat | वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

Next
तूर : लातूर जिल्‘ातील विनाअनुदानित शिक्षक दिनकर निकम हे गेल्या १३ वर्षांपासून एका विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावित आहेत़ परंतू त्यांना अद्यापपर्यंत वेतनाविना सेवा बजावावी लागत आहे़ परंतू, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने रात्रीच्या वेळी किर्तनसेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
घरात शिक्षणाचा वारसा नसतानाही बीएसस्सी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेऊन नौकरीच्या शोधासाठी भटकंती सुरु केली़ घरात माझे जास्तीचे शिक्षण झाल्यामुळे मला नक्की नोकरी मिळेल अशी आशा आई वडीलांसह कुटुंबातील सर्वांनाच होती़ परंतू, नौकरी काही मिळाली नाही़ जागा निघाली की मी इंटरव्युव्ह ला हजर राहत होतो़ जिल्‘ातच नाही तर परजिल्‘ातही अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्युव्ह दिला़ परंतू, यश काही मिळाले नाही़ अखेर २०१४ मध्ये औसा तालुक्यातील मोहरगा येथे शिक्षकाची नोकरी मिळाली़ उशिरा का होईना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंदाला पारावारच उरला नव्हता़ परंतू, शाळा विनाअनुदानित असल्याने अनुदान मिळेल तेव्हाच पगार मिळेल असे संस्थाचालकांनी सांगितले़ याचा निरोपही मी घरी दिला़ परंतू, आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर नोकरी कर असा सल्ला घरच्यांनी दिला़ परंतू, १२ जणांच्या कुटुंबाचा संसार भागणार कसा या विवंचनेत होतो़ परंतू थोडा परमार्थिक अभ्यास असल्याने नोकरी करून मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा सुरु केली़ अन् त्यातून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले़ १ ना २ वर्ष तब्बल १३ वर्ष पगारीविनाच नोकरी सुरु असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरु आहे़ परंतू अजूनही शासनाला जाग येत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा़़़
घरात स्वत: मी, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुले असा एकूण १२ जणांचा परिवार आहे़ नावालाच शेती त्यावरही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही़ त्यामुळे घरात एकमेव मी च नोकरीला होता़ मलाही पगार मिळत नसल्याने शाळेतूल मिळेल त्या वेळेत नविन गावाची निवड करून त्या गावात रात्री ९ ते ११ किर्तन करून मिळेल त्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले असून, दुष्काळी परिस्थितीत या किर्तन सेवेचाच आर्थिक आधार कुटुंंबाला मिळत आहे़

Web Title: Sand dump rickshaw and two-wheeler; Tension at the throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.