विद्यापीठात बेकायदेशीर वृक्षतोड

By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:23+5:302016-09-22T01:16:23+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची तक्रार महापालिकेच्या उद्याने विभागाकडे करण्यात आली आहे. आवारातील सुमारे ५० झाडे तोडण्यात आली असून त्यासाठी पालिकेत्या वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

Illegal tree trunk in the university | विद्यापीठात बेकायदेशीर वृक्षतोड

विद्यापीठात बेकायदेशीर वृक्षतोड

Next
णे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची तक्रार महापालिकेच्या उद्याने विभागाकडे करण्यात आली आहे. आवारातील सुमारे ५० झाडे तोडण्यात आली असून त्यासाठी पालिकेत्या वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या आवारातील खेर वाड्मय भवन आणि आंबेडकर भवन या इमारतींच्या मधल्या जागेत मागील आठवड्यात ही वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत विवेक वेलणकर व अतुल बागुल यांनी पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे. आवारात बाभूळ, बोर, चिंच, कडूलिंब अशी विविध प्रकारची झाडे आहे. विद्यापीठाने परवानगी न घेता सुमारे ५० झाडे तोडली आहेत. या वृक्षतोडीवेळी उद्यान विभागाकडे दुरध्वनीवरून तक्रार करण्यात आली होती. विभागाच्या कर्मचार्‍याने याची खातरजमाही केली आहे. यापुर्वीही विद्यापीठातील वृक्षतोडीबाबत सजग नागरिक मंचाने पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. परवानगी न घेतला वृक्षतोड करणे बेकायदेशीर असताना विद्यापीठाकडून असा प्रकार होत आहे. याबाबत पालिकेने गंभीर दखल घेवून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वेलणकर व बागुल यांनी केली आहे.
दरम्यान, विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वृक्षतोड केली नसल्याचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी सांगितले. वृक्षतोडीची चुकीची माहिती पसरवली जात आहे. नियमांच्या चौकटीत राहूनच विद्यापीठातील इमारतींचे बांधकामे चालु आहेत, असेही डॉ. कडू यांनी स्पष्ट केले.
----------------

Web Title: Illegal tree trunk in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.