शासकीय आयटीआयच्या नव्या सत्राला सुरुवात शैक्षणिक : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रॉ-मटेरिअलच्या खरेदीसाठी बैठक

By admin | Published: August 23, 2016 07:44 PM2016-08-23T19:44:06+5:302016-08-23T19:44:06+5:30

जळगाव : शासकीय आयटीआयच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या नव्या सत्राला प्रारंभ झाला आहे. या सत्रासाठी जिल्हाभरातील शासकीय आयटीआय तसेच टेक्निकल हायस्कूलसाठी लागणार्‍या रॉ-मटेरिअलच्या खरेदीसंदर्भात मंगळवारी जिल्हा शासकीय आयटीआयमध्ये विशेष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या शैक्षणिक सत्रासाठी लागणार्‍या रॉ-मटेरिअलचा आढावा, खरेदीसाठी राबवावी लागणारी इ-निविदा प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Government introduces new ITI academic: meeting for purchase of raw material as per government guidelines | शासकीय आयटीआयच्या नव्या सत्राला सुरुवात शैक्षणिक : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रॉ-मटेरिअलच्या खरेदीसाठी बैठक

शासकीय आयटीआयच्या नव्या सत्राला सुरुवात शैक्षणिक : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रॉ-मटेरिअलच्या खरेदीसाठी बैठक

Next
गाव : शासकीय आयटीआयच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या नव्या सत्राला प्रारंभ झाला आहे. या सत्रासाठी जिल्हाभरातील शासकीय आयटीआय तसेच टेक्निकल हायस्कूलसाठी लागणार्‍या रॉ-मटेरिअलच्या खरेदीसंदर्भात मंगळवारी जिल्हा शासकीय आयटीआयमध्ये विशेष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या शैक्षणिक सत्रासाठी लागणार्‍या रॉ-मटेरिअलचा आढावा, खरेदीसाठी राबवावी लागणारी इ-निविदा प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जळगाव जिल्‘ात जिल्हा शासकीय आयटीआयसह एकूण १७ शासकीय आयटीआय व पाच टेक्निकल हायस्कूल आहेत. दरवर्षी या २२ संस्थांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पॅ्रक्टिकल, जॉब मेकिंग तसेच निरनिराळ्या परीक्षांकरिता मोठ्या प्रमाणात रॉ-मटेरिअलच गरज भासते. शासकीय निधीतून दरवर्षी हे रॉ-मटेरिअल नव्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर खरेदी केले जाते. या खरेदीची प्रक्रिया जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीमार्फत राबवली जाते. या समितीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी यांच्यासह जिल्‘ातील प्रत्येक तालुक्याच्या शासकीय आयटीआयचे प्राचार्य व टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक यांचा सदस्य म्हणून समावेश असतो. शासनाने शासकीय आयटीआयसाठी लागणार्‍या रॉ-मटेरिअलच्या खरेदीसंदर्भात मार्गदर्शक सूचना आखून दिलेल्या आहेत. त्यानुसार दरवर्षी ही खरेदी समितीकडून केली जाते.
या साहित्याचा असतो समावेश
शासकीय आयटीआयला लागणार्‍या रॉ-मटेरिअलमध्ये स्टील, वेगवेगळ्या प्रकारचे नटबोल्ट, ग्रीस, ऑईल, तांब्याची तार तसेच इतर साहित्याचा समावेश असतो. प्रत्येक आयटीआय इन्स्टट्यिूटमध्ये दर प्रशिक्षणार्थी व दर महिना या प्रमाणानुसार प्रत्येकी २०० रुपयांचे रॉ-मटेरिअलचे निर्धारित केलेले असते. शैक्षणिक सत्राच्या प्रारंभ झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल, जॉब मेकिंगसाठी रॉ-मटेरिअलची गरज भासते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Government introduces new ITI academic: meeting for purchase of raw material as per government guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.